रात्री पावणे अकराला सापळा रचून लाच घेताना पोलीस शिपायास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:32 AM2018-05-06T01:32:12+5:302018-05-06T01:32:12+5:30
उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने कारवाई करू नये यासाठी 8 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री पावणे अकरा वाजता सापळा रचून पोलीस शिपायास पकडले.
पुणे - उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने कारवाई करू नये यासाठी 8 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री पावणे अकरा वाजता सापळा रचून पोलीस शिपायास पकडले. लाच लुचपत विभागाच्या इतिहासात इतक्या रात्री कारवाई करण्याची ही पहिली वेळ असेल.
वैभव चंद्रकांत बनकर ( वय 28, कोंढवा पोलीस ठाणे) असे या पोलीस शिपायाची नाव आहे.
तक्रारदार यांचे महंमद वाडी येथे हॉटेल पॉवर हाऊस हे हॉटेल आहे. ते रात्री उशिरापर्यंत चालू होते. त्यावर कारवाई करू नये म्हणून बनकर यांनी 8 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर हॉटेल पॉवर येथे सापळा रचण्यात आला. बनकर हे लाच घेताना त्यांना पकडण्यात आले. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते