पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; दरोडा टाकण्यापूर्वीच आरोपीना मुद्देमालासह केले गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:27 AM2020-12-31T11:27:20+5:302020-12-31T11:37:23+5:30

या टोळी कडून एकूण 8 लाख 38 हजार 638 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त

Police cinestyle performance; The accused were arrested before the robbery | पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; दरोडा टाकण्यापूर्वीच आरोपीना मुद्देमालासह केले गजाआड

पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; दरोडा टाकण्यापूर्वीच आरोपीना मुद्देमालासह केले गजाआड

Next

वाघोली: पुणे ग्रामीण हद्दीत आंतरराज्य आरोपींना दरोडा टाकण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना मुद्देमालासह गजाआड केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

या प्रकरणी गणेशन पेयांडी तेवर,शिवकुमार करपैया तेवर,पंडियेन सेहदू वैकट,सरवान गणेशन लचामी,गणेशन ओच्च तेवर,सेलवराज अंथन उनिखंडी( सर्व रा:तामिळनाडू) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १ जानेवारीच्या बंदोबस्ताच्या अनुसंगाने नगररोडवर पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी संशयित गाडीला (TN 55 V2682) सापळा रचुन ताब्यात घेतली.यावेळी सदरच्या गाडीत वरील आरोपी मिळुन आले असून या टोळी कडून एकूण 8 लाख 38 हजार 638 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

 पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाने, उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  पद्माकर घनवट, लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर,सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप,दत्तात्रय गिरमकर,गुरु जाधव, राजेंद्र थोरात,मुकुंद आयचीत,राजू पुणेकर, निलेश कदम, महेश गायकवाड,उमाकांत कुंजीर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रमोद नवले,दगडू वीरकर यांनी केली आहे

Web Title: Police cinestyle performance; The accused were arrested before the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.