Pune Police: पोलिसांची झाडाझडती; पण १ हजार ८२७ गुंडांचा ‘पत्ता’च नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:50 AM2023-09-18T10:50:47+5:302023-09-18T10:51:14+5:30

६८ कारवायांमध्ये ६९ जणांना अटक...

Police Clash; But there is no 'address' of 1 thousand 827 gangsters | Pune Police: पोलिसांची झाडाझडती; पण १ हजार ८२७ गुंडांचा ‘पत्ता’च नाही

Pune Police: पोलिसांची झाडाझडती; पण १ हजार ८२७ गुंडांचा ‘पत्ता’च नाही

googlenewsNext

पुणे : गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर पुणेपोलिसांनी मध्यरात्री शहरातील गुंडाची झाडाझडती घेतली. पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या भागात गुंडांविरुद्ध ६८ कारवाया करून एकूण ६९ जणांना अटक केली.

उत्सवाच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सराईतांविरुद्ध कारवाई करण्यासाठी रविवारी मध्यरात्री विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून गुंडांची तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा तसेच विविध पोलिस ठाण्यातील पथके या मोहिमेत सहभागी झाले होते. गुन्हेगार राहत असलेल्या भागाची पाहणी करण्यात आली. दोन हजार ५४४ गुंडांपैकी ७१७ गुंड मूळ पत्त्यावर राहत असल्याचे आढळून आले.

परिमंडळ एकच्या हद्दीत पोलिसांनी कोयता बाळगणाऱ्या गुंडाला अटक केली. गावठी दारूची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण ४७ कारवाया करून ४७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ६४ हजारांचा माल जप्त केला.

परिमंडळ दोनच्या हद्दीत गंभीर गु्न्ह्यात फरारी असलेल्या दोनजणांना अटक करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले. परिमंडळ तीन, परिमंडळ चार, परिमंडळ पाचमधील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली. अमलीपदार्थ विरोधी पथकाने गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी अक्षय सुरेश शिंदे (२२, रा. मयूरी काॅलनी, हांडेवाडी रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक किलो गांजा, मोबाइल, दुचाकी जप्त करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या युनिट तीनने पर्वती भागात गंभीर गुन्ह्यातील आरोपी आदित्य युवराज भालेराव (वय १९), ऋतिक दिलीप कांबळे (२३), गौरव वामन चव्हाण (२३), अजय राजू दास (१९, रा. महात्मा फुले वसाहत, सिंहगड रस्ता) यांना अटक केली. तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून २५७ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Police Clash; But there is no 'address' of 1 thousand 827 gangsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.