गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:54 PM2019-09-05T12:54:21+5:302019-09-05T12:56:26+5:30

गुन्हे शाखेच्यावतीने सोमवारी व मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे ऑपरेशन राबविण्यात आले़.

Police combing operation in the city due to Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

Next
ठळक मुद्देगुन्हेगारांची झाडाझडती : हॉटेलवर कारवाईरेकॉर्डवरील १६६ सराईत गुन्हेगारांपैकी ८५ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून गुन्हे शाखेच्यावतीने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची तपासणी केली़. त्यामध्ये रेकॉर्डवरील १६६ सराईत गुन्हेगारांपैकी ८५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच नोंदणीपुस्तिका अद्ययावत न ठेल्यामुळे ५ हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १०१ गुन्हेगार आढळून आले नाहीत़. गुन्हे शाखेच्यावतीने सोमवारी व मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे ऑपरेशन राबविण्यात आले़. 
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सर्व युनिट व अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली. 
गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कासेवाडी, कामगार पुतळा, राजीव गांधी झोपडपट्टीत कारवाई केली. त्यामध्ये ४८ गुन्हेगार तपासले, त्यापैकी २८ जण सापडले. युनिट दोनच्या पथकाने डायस प्लॉट औद्योगिक वसाहत, महर्षीनगर झोपडपट्टीत केलेल्या कारवाईमध्ये १८ पैकी ३ गुन्हेगार सापडले. युनिट तीनने जनता वसाहत, तुकाईनगर परिसरात पाहणी करून २१ पैकी ११  गुन्हेगारांना ताब्यात घेतले. 
युनिट चारच्या पथकाने लक्ष्मीनगर, येरवड्यातील तपासणीत २१ गुन्हेगारांपैकी १६ जण आढळून आले, तर युनिट पाचच्या पथकाने म्हाडा कॉलनी, रामनगर, आनंदनगर, सुरक्षानगर, बिरासदारनगर, इंदिरानगर, वेताळबाबा झोपडपट्टीत कारवाई केली. २० सराईत गुन्हेगार तपासले. त्यामध्ये ८ जण आढळून आले. दरम्यान, हडपसर पोलिसांच्या हद्दीत एक जण कोयता घेऊन फिरत असल्याची खबर मिळाली. त्यास अटक केली. 
अमली पदार्थविरोधी पथकाने (पश्चिम) ताडीवाला रस्ता झोपडपट्टीत १६ पैकी ४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले, तर अमली पदार्थ विरोधी पथकाने (पूर्व) २० गुन्हेगार तपासले. त्यापैकी १५ जण घरी सापडले़  मोकाअंतर्गत पूर्वी केलेल्या कारवाईतील ११ गुन्हेगारांपैकी एक जण आढळून आला, तर एमपीडीए अंतर्गत ५ गुन्हेगार तपासले. ते गुन्हेगार पोलिसांना आढळून आले. 
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने १९ लॉज तपासले. त्यांना निधी लॉज (हडपसर), अश्विनी लॉज (कात्रज), न्यू रॉयल लॉज (कोंढवा), हॉटेल राज पॅलेस (कोंढवा) व हॉटेल गारवा (कोंढवा) यांनी त्यांच्या लॉजची नोंदणी पुस्तिका अद्ययावत न ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली़. 

Web Title: Police combing operation in the city due to Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.