रक्ताने "मॉम, आय एम सॉरी" असे लिहून पोलिसाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:48+5:302021-06-23T04:08:48+5:30
रज्जाक महंमद मणेरी (वय २५, मूळ रा. बावडा ता. इंदापूर,पुणे) असे या तरुण पोलीस शिपायाचे नाव आहे. या ...
रज्जाक महंमद मणेरी (वय २५, मूळ रा. बावडा ता. इंदापूर,पुणे) असे या तरुण पोलीस शिपायाचे नाव आहे. या बाबत रज्जाक मणेरी यांचे वडील निवृत्त पोलीस कर्मचारी महंमद मणेरी यांनी राजगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. रज्जाक मणेरी हे सोमवार (२१ जून) रात्रीपासून फोन उचलत नसल्याने त्यांचे वडील व नातेवाईक किकवी येथे आले होते. त्यावेळी रज्जाक यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. ते दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी खिडकीतून काठीच्या साहाय्याने दरवाजा उघडला असता रज्जाक आतमध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी हाताची नस कापून त्यानंतर गळफास घेतल्याचे दिसले. मात्र, गळफास तुटून ते जमिनीवर पडले होते. घरातील फरशीवर रक्ताने 'मॉम, आय एम सॉरी' असे लिहिले होते. मणेरी यांच्या मृत्यूमुळे पोलीस सहकार्यांना धक्का बसला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी भेट दिली आहे. दरम्यान याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
सोबत फोटो :