धनकवडीत महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:28 PM2018-08-09T15:28:50+5:302018-08-09T15:29:26+5:30
पीडित महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पुणे : भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता धनकवडी येथील के.के. मार्केट बस स्टॉपवर घडली आहे.
संजय दिनकर कोंडे (वय ५०, रा़ कोयना बिल्डींग, हांडेवाडी रोड, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव बु. परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कोंडे यांच्याविरुद्ध विनयभंगाचागुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता धनकवडी येथील के.के. मार्केट बस स्टॉपवर घडली आहे.
पीडित महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस हवालदार कोंडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. हवालदार कोंडे हे शहर वाहतुक शाखेत कार्यरत आहेत. विनयभंगाच्या गुन्हयात एखाद्या पोलीस हवालदाराला तत्काळ अटक होण्याची ही अलीकडील
काळातील पहिलीच वेळ आहे.