पुण्यामध्ये पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 10:14 AM2018-08-09T10:14:51+5:302018-08-09T10:17:30+5:30

डेक्कन पोलीस ठाण्यात नेमणूकीला असलेले पोलीस हवालदार उमेश राऊत (45) यांनी बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

police constable commits suicide in Pune | पुण्यामध्ये पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यामध्ये पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

पुणे : डेक्कन पोलीस ठाण्यात नेमणूकीला असलेले पोलीस हवालदार उमेश राऊत (45) यांनी बुधवारी (8 ऑगस्ट) रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  स्वारगेट पोलीस लाईन बिल्डिंग नंबर 6 येथे  रात्री साडेअकरा वाजता ही घटना उघडकीस आली.  घरगुती कारणामुळे राऊत यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश राऊत हे स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये राहतात. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी गुजरात येथे असतो. डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे कोर्ट ड्युटीचे काम होते. रात्री नेहमीप्रमाणे ते घरी आले़ त्यानंतर पती पत्नीत भांडणे झाले. त्याचदरम्यान उमेश राऊत यांनी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ बाथरुममधून बाहेर न आल्याने त्यांच्या पत्नीने हाक मारली. तरीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी दरवाजा उघडल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले़. 

घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राऊत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. उमेश राऊत यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच डेक्कन पोलीस ठाण्यात शोककळा पसरली. राऊत हे  नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी पोलीस ठाण्यात आले होते. सर्वांशी हसून गप्पा मारत ते कोर्टात गेले होते. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यावर कोणता तणाव असल्याचे कधी जाणवले नाही. त्यांनी कधीही आपल्याला काही त्रास असल्याचे सांगितले नाही, असे डेक्कन पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: police constable commits suicide in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.