लग्नासाठी स्थळ दाखवण्याच्या बहाण्यानं तरुणीचा विनयभंग; हवालदाराविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 11:46 AM2021-02-16T11:46:41+5:302021-02-16T11:49:55+5:30

लॉजवर नेऊन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदाराविरोधात गुन्ह्याची नोंद

police constable in pune Molested young woman by taking her to the lodge | लग्नासाठी स्थळ दाखवण्याच्या बहाण्यानं तरुणीचा विनयभंग; हवालदाराविरोधात गुन्हा दाखल 

लग्नासाठी स्थळ दाखवण्याच्या बहाण्यानं तरुणीचा विनयभंग; हवालदाराविरोधात गुन्हा दाखल 

googlenewsNext

पुणे : लग्नासाठी स्थळ दाखवण्याचा बहाणा करुन तरुणीला लॉजवर नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल केला आहे.

दादाराम ताकमोडे असे या हवालदाराचे नाव आहे. ताकमोडे याची नेमणूक शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आहे. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या भावाला स्वारगेट पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात बंडगार्डन लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. १ ते २४ डिसेंबर २०२० दरम्यानच्या काळात ताकमोडे याने फिर्यादीसोबत ओळख करुन घेऊन त्यांच्याशी वेळोवेळी फोनवर बोलून लग्नासाठी स्थळ दाखविण्याचा बहाणा केला. त्यांना २४ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी यांना दुपारी साडेतीन वाजण्याचे सुमारास फोन करुन अग्रवाल लॉज येथे नेऊन त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सपकाळे अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: police constable in pune Molested young woman by taking her to the lodge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.