ट्रक चालकाला लुबाडणाऱ्या दाेघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 02:22 PM2018-05-27T14:22:20+5:302018-05-27T14:22:20+5:30

पुणे - मुंबई महामार्गावार ट्रकचालकाला धमकावून लुबाडणूक करणाऱ्या दाेघांना गस्तीवरील पाेलीसांनी अटक केली अाहे.

police cought two accused for looting truck driver | ट्रक चालकाला लुबाडणाऱ्या दाेघांना अटक

ट्रक चालकाला लुबाडणाऱ्या दाेघांना अटक

पिंपरी : ट्रक चालकाला अडवून लुबाडणूक करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दोघांना ताब्यात घेण्याची  ही कारवाई पुणे-मुंबई महामार्गावर करण्यात आली. संजय शिंदे (वय ५०, नारायणगाव) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अशोक माकोडे (वय २२, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) आणि योगेश बाठे (वय २१, रा. किरकटवाडी, खडकवासला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक माकोडे (वय २२, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) आणि योगेश बाठे (वय 21, रा. किरकटवाडी, खडकवासला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संजय ट्रक चालक म्हणून काम करतात. शनिवारी रात्री ते पुणे मुंबई महामार्गावरून जात होते. महामार्गावरील शिरोळे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ट्रकला हात करून दोघांनी थांबविले. शिंदे यांना अशोक आणि योगेश या दोघांनी धमकावले. तसेच त्यांच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हिंजवडी पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पोलीस पथक या महामार्गावरून जात होते, त्यावेळी ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी आरोपींची चौकशी केली. त्यावेळी आरोपींकडे सत्तूर आणि तलवार अशी घातक शस्त्र आढळून आली दोघांकडे कसून चौकशी केली असता, लूटमार करण्याच्या उद्देशाने संजय यांचा ट्रक अडविल्याचे दोघांनी मान्य केले. अशोक आणि योगेश या दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: police cought two accused for looting truck driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.