हातभट्टी दारूविक्री व्यावसायिकांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:05+5:302021-05-18T04:12:05+5:30

बारामती तालुक्यातील मोढवे येथे मोरेंच्या जुन्या वाड्याशेजारी हातभट्टी दारु तयार करून जवळच्या व्यक्तीला विक्री केली जात होती. ...

Police cracks down on liquor dealers | हातभट्टी दारूविक्री व्यावसायिकांवर पोलिसांची कारवाई

हातभट्टी दारूविक्री व्यावसायिकांवर पोलिसांची कारवाई

Next

बारामती तालुक्यातील मोढवे येथे मोरेंच्या जुन्या वाड्याशेजारी हातभट्टी दारु तयार करून जवळच्या व्यक्तीला विक्री केली जात होती. या प्रकरणी पोपट एकनाथ ननावरे (रा. मोढवे), संदीप शंकर गव्हाणे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे पंधरा लिटर हातभट्टी दारु आढळून आली. तसेच मोरगाव येथे मयुरेश्वर विद्यालय शाळेच्या पाठीमागे आंबी रस्त्यालगत हातभट्टी विक्री व्यवसाय सुरु होता. येथे पोलिसांनी धाड टाकून पाच लिटर हातभट्टी दारु मुद्देमाल व प्रमिला संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मोरगावमध्ये मोनिका विजय गायकवाड सखु संत्रा या देशी दारुची विक्री करत असल्याने त्यावर कारवाई केली आहे. सुपा येथे लाला दिलीप सकट यास हातभट्टी दारु विक्री प्रकरणी पोलिसांनी धडक कार्यवाही केली. येथे ६१प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये हातभट्टी दारु विक्री करण्यासाठी ठेवली असल्याचे आढळून आली. वडगाव निंबाळकरचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळुंके, मोहरकर, मोहिते, पोलीस नाईक पानसरे, धेंडे, प्रियांका झणझणे, पोपट नाळे, विशाल नगरे यांनी कार्यवाही केली.

————————————————

Web Title: Police cracks down on liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.