चोरी करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
By admin | Published: July 17, 2017 04:19 AM2017-07-17T04:19:59+5:302017-07-17T04:19:59+5:30
खिडकीची जाळी उचकटून दुकानातील ८५ हजारांचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी दोघांना लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खिडकीची जाळी उचकटून दुकानातील ८५ हजारांचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी दोघांना लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश रविवारी दिला. त्यांच्या ताब्यातून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
तौसीफ ऊर्फ बाबाजी बशीर शेख (वय १९), अमोल किसन अवचरे (वय १९, दोघेही रा. काशेवाडी) अशी कोठडी सुनावलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी सज्जू किशनचंद नानवाणी (वय ६३, रा. साळुंखे विहार रोड) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. फिर्यादीचे लष्कर परिसरातील एमजी रस्त्यावर कापडाचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपींनी दुकानाच्या मागच्या बाजूच्या खिडकीची लोखंडी जाळी उचकटून आतमध्ये प्रवेश
केला. त्यानंतर दुकानातील सुमारे ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ८० हजार ८०० रुपयांची रोकड असा एकूण ८५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरी केला.
याप्रकरणी त्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ प्रमाणे लष्कर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वीही आरोपींना चोरीच्या विविध दोन गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांचे अन्य कोणी साथीदार आहेत का, तसेच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास करायचा असल्याने सहायक सरकारी वकिलांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालायने ती मान्य करत १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.