बेकायदा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्याला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:27+5:302021-03-22T04:11:27+5:30
पुणे : बेकायदा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने त्याला २२ ...
पुणे : बेकायदा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सुनील धोत्रे (वय ३७, रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार महेश बोयणे यांनी फिर्याद दिली आहे. २० मार्च रोजी कर्वेनगर परिसरात ही घटना घडली.
धोत्रे याच्याकडे १० हजार रुपये किंमतीचा बेकायदा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस पोलिसांना आढळले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी धोत्रे याला न्यायालयात हजर केले असता, गावठी कट्टा त्याने कोठून आणला? याची तो कोणाला विक्री करणार होता का? त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? त्याच्याकडे अशा प्रकारे आणखी गावठी कट्टे, काडतुसे आहेत का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.