1 कोटी लाच प्रकरणात तहसीलदार डोंगरेसह पत्रकाराला अटक, २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 09:19 PM2018-12-30T21:19:27+5:302018-12-30T21:24:49+5:30

१ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेले तहसीलदार सचिन महादेव डोंगरे याच्यासह पत्रकार किसन सोमा बाणेकर या दोघांना रविवारी अटक करण्यात आली.

Police custody for Tahsildar Dongaran, arrested in connection with 1 crore bribe case | 1 कोटी लाच प्रकरणात तहसीलदार डोंगरेसह पत्रकाराला अटक, २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

1 कोटी लाच प्रकरणात तहसीलदार डोंगरेसह पत्रकाराला अटक, २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext

पुणे : मूळशी तालुक्यातील लवळे येथील वडिलोपार्जित सामायिक ईनामी वर्ग शेत जमिनीबाबत निकालपत्र तक्रारदारांच्या बाजूने देण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेले तहसीलदार सचिन महादेव डोंगरे याच्यासह पत्रकार किसन सोमा बाणेकर या दोघांना रविवारी अटक करण्यात आली. त्यांना सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

सचिन डोंगरे यांना लाचप्रकरणी पकडल्यानंतर त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापडी गावी बंगला असल्याची माहिती मिळाली. तसेच मोहोळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेत लॉकर तसेच करमाळा येथेही आणखी एक लॉकर असल्याची माहिती मिळाली. त्याच्या चाव्या डोंगरे यांच्याकडे आहेत. डोंगरे यांच्या सोलापूर येथे बंगला आहे. त्याची झडती घेण्यात आली असून त्याचा रिपोर्ट अद्याप आलेले नाही. डोंगरे यांनी खासगी व्यक्ती किसन सोमा बाणेकर (वय ४०, रा. लवळे, ता. मुळशी) याच्या हस्ते डोंगरे यांनी ही रक्कम स्वीकारली आहे.

याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे ६३ वर्षांचे असून सध्या ते दौंड येथे राहतात. शितोळे सरकार यांना मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी ईनामी जमिनी मिळाल्या आहेत. तक्रारदार हे त्यांचे वारसदार असून त्यांची लवळे येथे शेतजमीन वडिलोपार्जित सामायिक ईनामी वर्ग पाच एकर आहे. ही शेतजमीन त्यांच्या सर्व भाऊ बंदाची फसवणूक करून प्रकाश कृष्णराव शितोळे यांनी परस्पर विकली. याबाबत त्यांनी वेळोवळी वारस नोंदीबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला होता. या वारसा नोंदीबाबतची फाईल मंत्रालयात गेली होती. तेथील सचिवाने यातील कागदपत्रांची पुन्हा छाननी करुन अहवाल देण्यास मूळशी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्याकडे पाठविली होती. तक्रारदारांनी वेळोवेळी याबाबत संपर्क साधून त्यांना निकालपत्र देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी निकालपत्र देण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ डिसेंबरला केली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर शनिवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लवासा रस्त्याजवळील उरवडे गावाजवळील एका कंपनीच्या गेटसमोर किसन बाणेकर याच्यामार्फत १ कोटी रुपये स्वीकारताना डोंगरे यांना पकडण्यात आले. शिवाजीनगर येथील न्यायालयात रविवारी सायंकाळी दोघांना हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. हेमंत जंजाळ, अ‍ॅड. नंदकुमार शिंदे, अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. कुमार पायगुडे यांनी काम पाहिले. डोंगरे यांनी ज्या कामासाठी ही लाच स्वीकारली. ती त्या संदर्भातील कागदपत्रे ही त्यांच्या कार्यालयात असून कार्यालय बंद असल्याने कागदपत्रांच्या प्रती तपासून ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यांच्या बंगल्याची झडती पूर्ण झालेली नाही. तसेच त्यांच्या बँक लॉकरची तपासणी करायची आहे. किसन बाणेकर याचा तहसीलदार कार्यालयात वावर असून, तो खासगी एजंट म्हणून काम करीत असल्याने त्याच्याकडे चौकशी करायची आहे. यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोघांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Web Title: Police custody for Tahsildar Dongaran, arrested in connection with 1 crore bribe case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.