विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकाला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 06:08 PM2018-11-13T18:08:34+5:302018-11-13T18:10:16+5:30

सहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणार्‍या शिक्षक संदीप गाडेला न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Police custody till 15th November to teacher who is inhumanly beat the student | विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकाला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी 

विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकाला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी 

Next

पुणे : श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल ( एसएसपीएमएस ) या शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणार्‍या शिक्षक संदीप गाडेला न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्याला चित्रकलेची वही अपुर्ण राहिली म्हणून गाडे याने त्याला चेहरा वाकडा पडेपर्यंत अमानुष मारहाण केली होती.

              याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसन्न शैलेंद्र पाटील असं विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा इंदापूर तालुक्यातील रहिवासी आहे. तो एसपीएमएस या शाळेत प्रसन्न इयत्ता 6 वीच्या वर्गात शिकतो व याच शाळेच्या वसतिगृहात राहतो. दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी शाळेतील अभ्यासक्रमाची चित्रकलेचा विषयाची पूर्ण न केल्याने शाळेतील शिक्षक गाडे याने विद्यार्थ्याला मारहाण केली होती. हा प्रकार विद्यार्थ्याने भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही. सुट्ट्या लागल्यावर त्याच्या पालकांना चेहरा वाकडा झालेला दिसून आला.त्यांना त्याला  दवाखान्यात नेल्यावर  हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

            शिक्षकाने केलेल्या मारहाणीविरोधात पालकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती .तक्रारीनंतर पोलिसांना संदीप गाडेला मारहाणीच्या आरोपाखाली सोमवारी सायंकाळी अटक केली होती.  शाळा व्यवस्थापनाने संदीप गाडे याला तातडीने निलंबित केलं असून  संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Police custody till 15th November to teacher who is inhumanly beat the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.