पुणे शहरातील रेशन दुकानांसाठी पोलिसांची नियमावली; अंमलबजावणी दुकानदारांना बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 08:46 PM2020-04-25T20:46:59+5:302020-04-25T20:49:23+5:30
नियमांचे उल्लंघन केल्यास दुकान बंद करण्याचे व नागरिकांना घरी परत जाण्याचे पोलिसांकडून निर्देश
पुणे : शहरातील रेशन दुकानांतून केशरी कार्डधारकांना धान्य देण्यास शनिवारपासून सुरुवात करण्यात आली असून धान्य वितरणासाठी पोलिसांनी दुकानदारांना नियमावली घालून दिली आहे. या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणे सर्व दुकानदारांना बंधनकारक असणार आहे. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास दुकान बंद करण्याचे व नागरिकांना घरी परत जाण्याचे पोलिसांकडून निर्देश दिले जाऊ शकतात. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार वेगाने वाढत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक व नागरिकांच्या सुविधांबाबत शासन स्तरावर विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. केशरी शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानात सवलतीच्या दरातधान्य वितरीत करण्यात येणार आहे. त्यावेळी विनाकारण दुकानात गर्दी होऊ नये, संसर्ग दूर ठेवता यावा यासाठी पोलिसांकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून देखील एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच नागरिकांना धान्य वितरीत करण्यात येणार आहे.
* सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत दुकान चालू ठेवण्यास परवानगी राहिल.
* टोकन मिळविण्यासाठी नागरिक सकाळी ८ पूर्वी गर्दी करू शकतात़ त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त असणार आहे.
* नागरिकांना उभे राहताना सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहणेबाबात निर्देश द्यावेत, त्यासाठी दुकानदारांना रांगेचे योग्य मार्किंग करावे लागणार आहे.
* कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून सुचित केलेल्या खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील.
* आवश्यक सुचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सोय करणे दुकानदारांना बंधनकारक
* संचारबंदीचे आदेश शहरात लागू आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य वाटप दुकानात जाण्याच्या निमित्ताने इतरांकडून आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या दुकानात जाणाºया व्यक्तीकडे अधिकृत टोकन असल्याची खात्री करण्यात येणार आहे.
* सर्व शिधापत्रिकाधारकांना टोकन वितरित करुन पहिल्या १०० शिधापत्रिका धारकांना प्रथम धान्य वितरण करण्यात येईल़ उर्वरित शिधापत्रिकाधारकांनावेळापत्रकांप्रमाणे पुढील तारखेचे टोकन देण्यात येईल़
* प्रत्येक तासाला १५ टोकनधारक याप्रमाणे दिवसाला किमान १०० जणांना धान्य वितरण करण्यात येईल़
शहरात ४ लाख ६० हजार केशरी शिधापत्रिकाधारक
पुणे शहरात केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या ४ लाख ६० असून सुमारे ५००शिधा वाटप दुकाने आहेत़ पुढील १० दिवसात रेशन दुकानांतून प्रत्येकीसुमारे १ हजार म्हणजे प्रत्येक दिवशी १०० शिधापत्रिकाधारक धान्यखरेदीसाठी दुकानात येऊ शकतात़ त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे़
शिधापत्रिका धारकांसाठी संपर्क व्यवस्था : टोल फ्री क्रमांक १०७७
मदत केंद्र क्रमांक - ०२० - २६१२३७४६ (सकाळी ८ ते रात्री ८वा़), मोबाईल
क्रमांक ८१४९६२११६९/८६०५६३८६६़
............