Pune Crime: पुण्यात पोलिसाची मुजोरी; खंडणी मागत केली पेट्रोलपंपचालकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 06:18 PM2022-10-06T18:18:31+5:302022-10-06T18:30:28+5:30

पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

police demanded installment from the petrol pump operator; Filed a case pune crime news | Pune Crime: पुण्यात पोलिसाची मुजोरी; खंडणी मागत केली पेट्रोलपंपचालकाला मारहाण

Pune Crime: पुण्यात पोलिसाची मुजोरी; खंडणी मागत केली पेट्रोलपंपचालकाला मारहाण

googlenewsNext

पुणे : मी पोलीस आहे. तुमचा पेट्रोलपंप चांगला चालतो. कोणी तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून दरमहा हप्ता द्यावा लागेल, असे सांगत पेट्रोलपंप चालकाकडे दरमहा हप्ता मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्रदीप रावसाहेब मोटे (३५) असे गु्न्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पेट्रोलपंपचालक काळूराम दत्तात्रय खांदवे (३५, रा. कोपरआळी, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

खांदवे यांचा लोहगाव भागात पेट्रोलपंप आहे. पोलीस कर्मचारी मोटे हे खांदवे यांच्या पंपावर आले. कोणी तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून दरमहा हप्ता द्यावा लागेल, असे मोटे यांनी खांदवे यांना सांगितले. त्यानंतर खांदवे आणि त्यांचा भाऊ तुकाराम यांना मोटे यांनी मारहाण केली. खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मोटे यांच्या विरोधात खंडणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक लहाणे तपास करत आहेत.

Web Title: police demanded installment from the petrol pump operator; Filed a case pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.