खूनप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

By admin | Published: June 27, 2017 07:52 AM2017-06-27T07:52:38+5:302017-06-27T07:52:38+5:30

पूर्ववैमनस्यातून २५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याप्रकरणी एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Police detained suspect for murder | खूनप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

खूनप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून २५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याप्रकरणी एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
शाहरूख ऊर्फ सनी अरुण कांबळे (वय २५, रा. दुगडचाळ, सातवनगर, हांडेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नसीम मोहंमद अन्सारी ऊर्फ शिकारी (वय २९, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे कोठडी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हर्षल अशोक जावळे (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ३० मे रोजी रात्री दोनच्या सुमारास हडपसरमधील पांढरे मळा कॅनॉल परिसरात ही घटना घडली. पूर्वी झालेल्या वादातून नसीम अन्सारी याने सनी कांबळे या तरुणाला धारदार शस्त्राने भोसकल्याने यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी प्रत्यक्षदर्शी ३ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि वाहन जप्त करायचे आहे. त्याने पूर्वीच्या वादासह आणखी इतर कोणत्या कारणावरून हा गुन्हा केला. तसेच, घटनेतील सूत्रधारासह त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घ्यायचा असल्याने सहायक सरकारी वकिलांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Web Title: Police detained suspect for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.