लॉकडाऊनच्या काळातही लोकांची तलफ काही सुटता सुटेना, तंबाखू,सिगारेटवरील कारवाई थांबता थांबेना 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:44 PM2020-04-29T16:44:34+5:302020-04-29T16:54:58+5:30

शिवणे परिसरात तब्बल १४ लाख ४१ हजार रूपयांचे सिगारेट व तंबाखू जप्त

The police did not stop the action on tobacco, gutkha and cigarettes During the lockdown | लॉकडाऊनच्या काळातही लोकांची तलफ काही सुटता सुटेना, तंबाखू,सिगारेटवरील कारवाई थांबता थांबेना 

लॉकडाऊनच्या काळातही लोकांची तलफ काही सुटता सुटेना, तंबाखू,सिगारेटवरील कारवाई थांबता थांबेना 

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट एकची कारवाई तीन सुझुकी कारमध्ये मोठ्या प्रमाणात सिगारेट व तंबाखू विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून

पुणे : लॉकडाऊनच्या दरम्यान हातभट्टी दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ यांच्या बेकायदेशीर विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील छुप्या पद्धतीने अनेकजण त्याची विक्री करताना दिसत आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. शिवणे परिसरात तीन कारमधून तंबाखू व सिगारेटची विक्री करणाऱ्या व त्यांना मालाचा पुरवठा करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोहित सिताराम प्रजापती (वय २३, रा.महाल्क्षमी कॉम्पलेक्स, शिवणेगाव), विजय सिताराम प्रजापती (वय २५), पंकज शिवनारायण प्रजापती (वय २२) आणि मुकेश पारसमल छाजेड वय (वय ४०, सर्वजण रा. सहकारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रजापती हा मालाचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे.


गुन्हे शाखा युनीट एकचे पोलिस नाईक सचिन जाधव यांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरुण वाईकर यांच्या पथकाने शिवणे येथील महालक्ष्मी कॉम्लेक्स छापा टाकला. त्यावेळी तीन सुझुकी कारमध्ये मोठ्या प्रमाणात सिगारेट व तंबाखू विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. या ठिकाणा तीन आरोपींना अटक करत तब्बल १४ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना या मालाचा पुरवठा प्रजापती करत असल्याचे समजले. त्यानुसार त्याला देखील अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या विरोधात सिगारेट, तंबाखू कारसह पुढिल कारवाई करीता उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. आरोपींनी हा माल कोठून आणला आहे, याचा उत्तमनगर पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: The police did not stop the action on tobacco, gutkha and cigarettes During the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.