वाहन नसल्याने पोलिसांचीच कसरत

By admin | Published: November 26, 2014 11:39 PM2014-11-26T23:39:19+5:302014-11-26T23:39:19+5:30

‘‘पाटस पोलीस चौकीसाठी सर्वसोईनींयुक्त प्रशस्त जागेत इमारत बांधण्यात आली.

Police do not work because there is no vehicle | वाहन नसल्याने पोलिसांचीच कसरत

वाहन नसल्याने पोलिसांचीच कसरत

Next
मनोहर बोडखे - दौंड
‘‘पाटस पोलीस चौकीसाठी सर्वसोईनींयुक्त प्रशस्त जागेत इमारत बांधण्यात आली. परंतु,  पोलिस चौकीचा अवाढव्य परिसर आणि त्या तुलनेत पोलिसांची अपु-या संख्येमुळे अतिरिक्त कामाचा ताण पडतो. यामुळे  गुन्हेगारी वाढत आहे. येथील वारंवार खंडीत होणारी दूरध्वनी सेवा पाटस पोलीस चौकीला आणि ग्रामस्थांची डोकेदुखी ठरली आहे. 
 पाटस पोलीस चौकी अंतर्गत कानगाव, हातवळण, वरवंड, कडेठाण, पाटस, बिरोबावाडी, रोटी, हिंगणीगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी, देऊळगावगाडा या प्रमुख गावांसह वाडय़ा वस्त्यांचा कार्यभार आहे. या गावांचा  पसारा मोठा असल्याने पोलीसांना काही गावातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी दमछाक होते. 
या पोलीस चौकीत एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस, एक महिला पोलीस अशी पोलीसांची संख्या आहे.  रात्रीच्या वेळीला पुणो सोलापूर महामार्गावर गस्त घालण्यासाठी व्हॅन आहे. परंतु दिवसा पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रतील काही गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास केवळ वाहनांअभावी पोलीसांना घटनास्थळी वेळेवर पोहचता येत 
नाही. यामुळे या पोलीस चौकीसाठी चार चाकी वाहनाची आवश्यकता आहे. पोलिसांची संख्या वाढविल्यास गुन्हेगारांवर वचक बसवता येणार 
आहे.
पाटस ही तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या गावासह वाडय़ावस्त्यांची वर्दळ वाढलेली आहे. त्यातच पाटस पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रत असलेल्या कुसेगावमध्ये अधूनमधून दारुचा धंदा चालतो तर काही गावांमध्ये मटका अणि जुगार खेळला जातो. मात्र अपु:या पोलीस संख्येमुळे गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी पोलीसांवर ताण येतो.
पाटस जवळच कुरकुंभ गाव असल्याने या गावात औद्योगिक वसाहत आहे.या वसाहतीत  कामकाजानिमित्ताने परप्रांतीयांची मोठी संख्या आहे काही परप्रांतीयांची दादागिरी देखील वाढलेली आहे. 
पाटस पोलीस चौकीअंतर्गत काही गावे  संवेदनशील आहे. त्यामुळे या गावात केव्हा काय उद्रेक होईल याची शाश्वती नाही त्यामुळे पोलीसांची संख्या वाढविणो गरजेचे आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेळप्रसंगी चोरांचा पाठलाग करण्यासाठी पोलिसदलाला वेगवान वाहनांची गरज असते. 
मात्र पोलिस घटनास्थळी पोहचणार कसे?   
 
4पाटस पोलीस चौकीचा दूरध्वनी क्रमांक हा परिसरातील ग्रामस्थांना माहित आहे. रात्रीबेरात्री काही घडले तर पोलीस चौकीला फोन लाऊन पोलीसांना घटनेचे वृत्त देता येते मात्र सातत्याने फोन नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या वेळेला नेमके कुणाला संपर्क साधायचा हा प्रश्न ग्रामस्थात गंभीररुप धारण करुन आहे. पोलीसांचे मोबाईल सर्वानाच माहिती असेल असे नाही आणि जर मोबाईल लावलाच तर तो पोलीस उचलतीलच याची खात्री नाही तेव्हा पाटस पोलीस चौकीतील दूरध्वनी कायम कार्यरत रहावा, अशीही मागणी पुढे आली आहे. 

 

Web Title: Police do not work because there is no vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.