मांजरीमुळे पोलिसांच्या घरात भांडण
By admin | Published: December 14, 2015 12:03 AM2015-12-14T00:03:45+5:302015-12-14T00:06:36+5:30
दोन पोलीस निरीक्षक शेजारी शेजारी रहायला...एकाच्या दाराला लावलेली असते दुधाची पिशवी...आगाऊ मांजर ही पिशवी फाडते...फाटलेल्या पिशवीमधून दूध दुस-या पोलीस निरीक्षकाच्या दारात वाहात जाते
पुणे : दोन पोलीस निरीक्षक शेजारी शेजारी रहायला...एकाच्या दाराला लावलेली असते दुधाची पिशवी...आगाऊ मांजर ही पिशवी फाडते...फाटलेल्या पिशवीमधून दूध दुस-या पोलीस निरीक्षकाच्या दारात वाहात जाते...हे दुध कोणी पुसायचे यावरुन वाद पेटतो...तावातावात पोलीस निरीक्षक महाशय भांडायला सुरुवात करतात...आपला पतीही पोलीस निरीक्षकच असल्यामुळे शेजारीण बाईही भांडायला उठतात...एका मांजरीमुळे भडक लेले हे भांडणे पोचते पोलीस ठाण्यात...दोन निरीक्षकांच्या घरात लागलेले भांडण मिटवण्यासाठी काय ‘फॉर्म्युला’ वापरावा या विचारात पोलीस ठाण्याचे निरीक्षक पडतात...गोंधळा गोंधळात शेवटी दाखल होतो अदखलपात्र गुन्हा.
परंतु आपण दुध सांडलेले नसल्यामुळे आपापल्या दारापुढचे दुध आपापले पुसून घ्यावे असा पवित्रा या महिलेने घेतला. त्यावरुन या दोन्ही निरीक्षकांच्या बायकांमध्ये जुंपली. शाब्दिक ‘चकमक ’ उडाली. नागपुरच्या निरीक्षकाच्या पत्नीने रागाने दार आपटून बंद केले. एरवी हातामधील बळ वापरणा-या पुणे ग्रामीणच्या निरीक्षकाने आपल्या पायातील बळ त्या दारावर आजमावायला सुरुवात केली. दाराला लाथा घालत शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. नागपुरच्या निरीक्षकाच्या पत्नीने शेवटी पोलिसांकडेच दाद मागायचे ठरवत औंध पोलीस चौकी गाठली.
शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद त्यांनी दिली. दोन निरीक्षकांच्या घरातील भांडणे तिस-या पोलीस निरीक्षकाच्या पोलीस ठाण्यात आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोघांमध्ये ‘समेट’ घडवण्याचे सर्व प्रयत्न थकल्यावर शेवटी पुणे ग्रामीणच्या निरीक्षक महोदयांविरुद्ध चतुशृंगी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणावर पडदा पडला. (प्रतिनिधी)