पुण्यात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम ; २ हजार जणांवर गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 07:45 PM2020-04-04T19:45:43+5:302020-04-04T19:51:44+5:30

लॉक डाऊनच्या काळात अनेकदा विनंती करुनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या  लोकांना पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

Police filed charges against 2 thousand people under charges of 188 | पुण्यात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम ; २ हजार जणांवर गुन्हे 

पुण्यात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम ; २ हजार जणांवर गुन्हे 

Next

पुणे : लॉक डाऊनच्या काळात अनेकदा विनंती करुनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या  लोकांना पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस गेले आठवडाभर लोकांना घराबाहेर पडू नका़ गर्दी करु नका, अशी विनंती करीत आले आहे. मात्र, तरीही लोक पोलिसांचे ऐकण्यात तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आता कायदेशीर मार्गाचा वापर सुरु केला आहे. अकारण रस्त्यावर येणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़    

आता मोकाट फिरणाऱ्यांच्या भोवतालचा फास आता पुणे पोलिसांनी आणखीच कडक केला आहे .शहरात तब्बल १२१ ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे तर ‌आत्तापर्यंत कलम १८८ अंतर्गत २ हजार ७२७ जणांवर गुन्हा दाखल केला गेलाय. आजपर्यंत ९ हजार ३३५ नागरिकांना नोटीस बजावल्या आहेत. त्याचबरोबर ५ हजार ९३० वाहने जप्त केल्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले आहे. 

 शुक्रवारी एका दिवसात ४२९ जणांवर १८८ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तर १ हजार ४३५ नोटीस बजावल्या आणि १ हजार ३०१ गाड्या जप्त केल्या. त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून टेरेसवर गर्दी करणाऱ्यांवर आतापर्यंत वीस गुन्हे दाखल केलेत. ड्रोनची संख्या वाढवून आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनातून ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. या माध्यमातूनही गुन्हा दाखल होणार आहे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हे   दाखल करण्यात आले आहेत. 

Web Title: Police filed charges against 2 thousand people under charges of 188

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.