पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्याला दिला सुखद धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:55+5:302021-05-16T04:11:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे डॉक्टरांना दिवसांची रात्र करून काम करावे लागत आहे. गेले वर्षभर ताण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे डॉक्टरांना दिवसांची रात्र करून काम करावे लागत आहे. गेले वर्षभर ताण तणावाखाली डॉक्टर मंडळी काम करीत आहेत. त्यात दोघेही पतीपत्नी डॉक्टर असतील तर त्यांना क्षणाचीही फुरसत मिळत नाही. त्यात सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व दुकाने बंद आहेत. अशावेळी एका डॉक्टराने आपली समस्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ट्वीटरवरून सांगितली. पोलीस आयुक्तांनी या डॉक्टरांची ही समस्या सोडविली आणि शनिवारी सकाळी सकाळी त्यांना एक सुखद धक्का दिला.
डॉ. अश्विन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. दोघेही पतीपत्नी डॉक्टर आहेत. लग्नाचा वाढदिवस असला तरी आम्ही उद्या कामावर आहोत. लॉकडाऊनमुळे मी आपल्या पत्नीसाठी साधा केकही खरेदी करू शकत नव्हतो. पत्नीला काय गिफ्ट देऊ, सूचवा अशी विनंती त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ट्वीटरवर शुक्रवारी सायंकाळी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी त्यांना उत्तर देत कृपया तुमचा थेट मेसेज चेक करा, असे सांगितले. त्याचवेळी दरवाजावरील बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर हातात केक घेऊन पोलीस कर्मचारी उभा होता. डॉक्टरांना प्रथम विश्वासच बसला नाही. त्यांनी पोलीस आयुक्त आणि संपूर्ण पुणे पोलिसांचे आभार मानले.
फोटो - पोलीस डाॅक्टर