पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही : सुबोधकुमार जयस्वाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 01:47 PM2019-06-08T13:47:51+5:302019-06-08T13:57:08+5:30

पोलिसांवर समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. तेव्हा कर्तव्यातील बेजबाबदारपणा सोडून समाजाची योग्य सेवा करा...  

Police have no option without hard work: Subodh Kumar Jaiswal | पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही : सुबोधकुमार जयस्वाल 

पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही : सुबोधकुमार जयस्वाल 

Next
ठळक मुद्देनानवीजला दीक्षांत संचलन समारंभ गेल्यावर्षी शासनाने या केंद्राला २५ कोटींचा निधी दिलेला आहे. 

दौंड : ‘‘पोलिसांची बदनामी होईल, असे कृत्य पोलिसांनी करु नये. पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही,’’ असे मत पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले. नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या दीक्षांत शक्रवारी संचलन समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणेम्हणुन ते बोलत होते.  
जयस्वाल म्हणाले, पोलिसांवर समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. तेव्हा कर्तव्यातील बेजबाबदारपणा सोडून समाजाची योग्य सेवा करा.  देशात महाराष्ट्राच्या पोलिसांचे नावलौकिक आहे. परिणामी या नावलौकिकाला कोठेही तडा जावू देवू नका, परिणामी अंगी टापटिपपणा ठेवून देशाची सेवा करा असे शेवटी जयस्वाल म्हणाले.


अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी म्हणाल्या, १९८८ पासून नानवीज प्रशिक्षण केंद्राला सुरुवात झालेली आहे. आजपर्यंत मोठ्या संख्येने पोलीस जवान आणि पोलीस अधिकारी या केंद्रातून प्रशिक्षित झालेले आहेत.  दरम्यान प्रशिक्षणार्थीना कवायत, शस्त्राचे ज्ञान, कायदा याबाबत माहिती दिली जाते. गेल्यावर्षी शासनाने या केंद्राला २५ कोटींचा निधी दिलेला आहे. 
प्राचार्य नीलेश अष्टेकर यांनी प्रशिक्षण केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सीताराम नरके, वैभव पाटील यांनी संयुक्तरित्या केले. तर आभार नवीनचंद्र रेड्डी यांनी मानले.  
यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस जवानांचा सुबोधकुमार जायसवाल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणाथींंनी सवाद्य संचलन करुन उपस्थितीतांच्या टाळ्यांची दाद घेतली. या कार्यक्रमाला पोलीस दलातील मान्यवर प्रशिक्षणार्थी जवानांचे नातेवाईक आणि मान्यवर उपस्थित होते.  

Web Title: Police have no option without hard work: Subodh Kumar Jaiswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.