पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 02:47 PM2022-03-01T14:47:14+5:302022-03-01T14:50:08+5:30

चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल...

police have registered case against 7 persons for misconduct in pcmc police bharti | पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

Next

पिंपरी : शहर पोलीस दलासाठी शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यात गैरव्यवहार केल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. असाच प्रकार पुन्हा समोर आला असून, याप्रकरणी सात जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २८) गुन्हा दाखल करण्यात आला. 

अर्जून छोटीराम जारवाल, प्रताप मोहन सुलाने, जगदीश पन्नुगुसिंगे, रणजितसिंग मदनसिंग महेर, सचिन विष्णू गुसिंगे, सुरेश वाल्मीक गोमलाडू, संदीप रेवप्पा होवाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या भरती सेलचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खलाटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यातील तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, या भरतीमध्ये आरोपी सात उमेदवारांनी गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. फिर्यादी आणि पडताळणी समितीमधील सदस्य यांची त्याबाबत खात्री पटली. तसेच तज्ञांकडून त्याबाबत अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार सात उमेदवारांनी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत तपास करीत आहेत.

Web Title: police have registered case against 7 persons for misconduct in pcmc police bharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.