बलात्कारी नराधमांना राेखण्यात पाेलीस हतबल; पुण्यात ६ महिन्यांत तब्बल १३२ गुन्ह्यांची नाेंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 02:47 PM2022-06-16T14:47:29+5:302022-06-16T14:47:51+5:30

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर; उपाययाेजना ताेकड्या

police helpless in keeping rapists In Pune 132 crimes were registered in 6 months | बलात्कारी नराधमांना राेखण्यात पाेलीस हतबल; पुण्यात ६ महिन्यांत तब्बल १३२ गुन्ह्यांची नाेंद

बलात्कारी नराधमांना राेखण्यात पाेलीस हतबल; पुण्यात ६ महिन्यांत तब्बल १३२ गुन्ह्यांची नाेंद

Next

नम्रता फडणीस

पुणे: शहरातील महिला असुरक्षित झाल्याचे विदारक चित्र मागील सहा महिन्यांत घडलेल्या बलात्काराच्या घटनांमधून पुढे आले आहे. विविध पोलीस ठाण्यांत जूनच्या पंधरवड्यापर्यंत बलात्काराच्या घटनांचे तब्बल १३२ गुन्हे नोंदले गेले. गतवर्षी ही संख्या ९४ इतकी होती. यावरून शहरातील बलात्काराच्या घटना रोखण्यात पोलीस दल अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पोलिसांकडूनमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात दामिनी पथक, बीट मार्शल तैनात केले गेले. आयटी कंपनीतील महिला व नाइट ड्यूटीवरून परतणाऱ्या नोकरदार महिलांच्या मदतीसाठी ‘बडी कॉप’सारखी व्हॉटस्ॲप सुविधाही उपलब्ध केली. त्यानंतरही शहरातील बलात्कारांच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

याबाबत विचारणा केली असता पोलिसांकडून अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न पुढे केला जाताे. पुणे शहराची लोकसंख्या पन्नास लाखांपेक्षा अधिक असून, पोलीस कर्मचारी फक्त साडेदहा हजार आहेत. यावरून लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या तीनपट कमी असल्याचे स्पष्ट हाेते. यावरून महिलांची सुरक्षितता ‘रामभरोसे’ असल्यासारखी स्थिती आहे. पोलिसांचे मनुष्यबळ वाढेपर्यंत काय घटना घडताना पाहतच राहायचे का? आता महिला, मुलींना सातच्या आत घरात यायला सांगायचे का? असे प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केले जात आहेत.

घटनेनंतर जागी हाेते यंत्रणा

खाजगी बसमध्ये चालकानेच विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आली. त्यापूर्वी हडपसर, पुणे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतरच पोलीस प्रशासन खडबडून जागे होते. पुन्हा ‘जैसे थे’ची स्थिती असते. सातत्याने पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा कशी कार्यान्वित आहे हेच ऐकवले जाते. मात्र, घटनांना आळा बसविण्यात पोलीस दल पूर्णत: अपयशी ठरत आहे.

सर्वाधिक ४६ गुन्हे शहराच्या पूर्व भागात

परिमंडळ ५ मध्ये शहराचा पूर्व भाग येतो. यात खराडी, हडपसर, वानवडी, मुंढवा, लोणी काळभोर असे अनेक भाग समाविष्ट आहेत. याच परिमंडळ ५ मध्ये बलात्काराचे ४६ गुन्हे नोंदविले गेले आहेत.

''शहरात ३२ पोलीस ठाणे आहेत. त्याप्रमाणे पाच परिमंडळांत महिला अधिकारी आणि नोडल ऑफिसरची नेमणूक केली आहे. आयटी कंपनी असेल तेथील महिलांचा एक व्हॉटस्ॲप ग्रूप तयार केला आहे. रस्त्यात रिक्षा बंद पडली, तर संबंधित महिलेकडून नोडल ऑफिसर किंवा संबंधित पोलीस स्टेशनला माहिती कळविली जाते. त्यानंतर तात्काळ मदत केली जाते. पोलीस स्टेशनमध्ये नोकरदार महिलांची नोंद करून घेतली जात असल्याचे  सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके म्हणाल्या आहेत.'' 

''शहरात ३८ दामिनी मार्शल आहेत. त्यांच्या १५ जोड्या आहेत. एका पोलीस स्टेशन हद्दीत २ दामिनी मार्शल आहेत. पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. लालपरी आणि लोकलमध्ये पोलीस चौकींचे क्रमांक नमूद करावेत, यासंबंधी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. बऱ्याच बस स्थानकांवर सीसीटीव्ही नाहीत, बजेटसाठी ते थांबले आहे. तरीही आम्ही कुठे कमी पडतोय हेच कळत नाहीये. समाजात विकृती वाढत चालली असून, ती राेखण्यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. याचाही विचार करून ते वाढविण्याची गरज असल्याचे सुजाता शानमे (सहायक पोलीस निरीक्षक, महिला सहायता कक्ष, भरोसा सेल) यांनी सांगितले आहे.'' 

Web Title: police helpless in keeping rapists In Pune 132 crimes were registered in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.