पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने त्याला १०वीच्या परीक्षेत मिळाले ९८ टक्के मार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 07:10 PM2019-05-09T19:10:37+5:302019-05-09T19:12:47+5:30
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कुटुंबाची त्रासापासून मुक्तता तर झालीच शिवाय त्यांच्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के मार्क मिळाले.
पुणे: परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यासह दडपण असते पालकांवर..पाल्याच्या आरोग्यापासून ते अभ्यासाला पोषक वातावरणासाठी ते सर्वतोपरी प्रयत्नशील असतात.काही दिवसांपूर्वी मुलाच्या दहावीच्या अभ्यासामुळे सहकारनगर येथे राहायला आलेल्या पालकांसह व त्यांच्या मुलाला तेथील नागरिक व टवाळखोरांकडून त्रास होऊ लागला. त्यांनी सर्व ठिकाणी या त्रासाची तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण कुठेही त्यांच्या तक्रारीला न्याय मिळत नव्ह्ता. शेवटी त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर कुटुंबाची होणाऱ्या त्रासापासून मुक्तता तर झालीच शिवाय त्यांच्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के मार्क मिळाले.
स्वाती अशोक खुंटवड मुलाची आय.सी.एस.सी.बोर्डाची इयत्ता १०वी ची परीक्षा असल्याने काळजी घेत होते. परंतु,त्यांच्या सोसायटीच्या बाजूला बाहेरील बाजूला बसविण्यात आलेल्या बेंचवर ज्येष्ठ नागरिक, बाहेरील लोक किंवा टवाळखोर मुले यांच्याकडून गप्पा, टवाळखोरी, अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ यांचा खूप त्रास होऊ लागला. या त्रासाची कुटुंबासमवेत अनेक ठिकाणी तक्रार नोंदवून देखील काही परिणाम झाला नाही..त्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्याकडे तक्रार दिल्यावर त्यांनी तुम्ही निर्धास्त राहा येथून पुढे तुम्हांला कोणताही त्रास होणार नाही , तसेच परत तक्रार करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास खुंटवड कुटुंबाला दिला. त्याच दिवशी सायंकाळी दैनंदिन गस्ती दरम्यान रामचंद्र कृपा अपार्टमेंट,सहकारनगरच्या बाहेर असणा?्या पुणे महानगर पालिकेचे बेंच काढून टाकले. नुकत्याच लागलेल्या निकालात आय.सी.एस.सी.बोर्डात ९८ टक्के मार्क पडून उत्तीर्ण झाला आहे. त्या कुटुंबांनी स्वत: येऊन आज मुलगा पास झाल्याचे पेढे आणून दिले. घेवारे यांनी पण अवधूतला स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक व मूर्ती भेट देऊन स्वामीजी प्रमाणे बुद्धिमान हो व तुझ्या बुद्धीचा संपूर्ण भारत देशाला उपयोग होवो अशा शुभेच्छा दिल्या.
......