Maratha Reservation: पुणे शहर आणि जिल्ह्यातील २०० ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर
By नम्रता फडणीस | Published: October 31, 2023 06:29 PM2023-10-31T18:29:33+5:302023-10-31T18:30:12+5:30
शहर आणि जिल्ह्यातील सुमारे २०० संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवली आहे...
पुणे :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सोमवारी राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. बीड, सोलापूर, यवतमाळ परिसरात लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. तसेच शहर आणि जिल्ह्यातील सुमारे २०० संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवली आहे.
लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त ठेवला असून, यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. समाजमाध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरावरही पोलिसांनी नजर ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच समाजमाध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.