पोलिसांनीच लुटले कुरिअरचे लाखो रुपये

By admin | Published: January 3, 2016 05:03 AM2016-01-03T05:03:30+5:302016-01-03T05:03:30+5:30

नगरहून मुंबईकडे जाणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या लुटीमध्ये पुणे पोलिसांच्या

Police looted millions of rupees | पोलिसांनीच लुटले कुरिअरचे लाखो रुपये

पोलिसांनीच लुटले कुरिअरचे लाखो रुपये

Next

पुणे : नगरहून मुंबईकडे जाणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या लुटीमध्ये पुणे पोलिसांच्या ‘एसपीयू’चे दोन पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. या दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
रूपेश गायकवाड आणि सुनील ऊर्फ कपिल रंदवे अशी अटक पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही सध्या ‘विशेष सुरक्षा पथका’मध्ये नेमणुकीस आहेत. गायकवाड हा चालक आहे. या दोघांची मूळ नेमणूक राज्य राखीव पोलीस दलात असून, प्रतिनियुक्तीवर हे दोघेही एसपीयूमध्ये काम करीत आहेत. 

काय आहे एसपीयू?
- विशेष सुरक्षा पथक हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड पुरविणारे पथक आहे. सफारी कपड्यांमधले बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी या विभागामार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी पुरविले जातात.
- ज्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. त्या विभागातच असे कर्मचारी काम करीत आहेत.
- नुकत्याच उपराष्ट्रपतींच्या झालेल्या दौऱ्यामध्येही त्यांची सुरक्षा एसपीयूने पोलीस अधिकाऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांवरच ढकलल्याचेही समोर आले आहे. सध्या तरी या विभागामध्ये मनमौजी कारभार सुरू असून, कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.
- विशेष सुरक्षा पथक हे
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या
सुरक्षेसाठी पोलीस गार्ड पुरविणारे पथक आहे. सफारी कपड्यांमधले बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी या विभागामार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी पुरविले जातात.
- ज्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. त्या विभागातच असे कर्मचारी काम करीत आहेत.
- नुकत्याच उपराष्ट्रपतींच्या झालेल्या दौऱ्यामध्येही त्यांची सुरक्षा एसपीयूने पोलीस अधिकाऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांवरच ढकलल्याचेही समोर आले आहे. सध्या तरी या विभागामध्ये मनमौजी कारभार सुरू असून, कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.

Web Title: Police looted millions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.