जिल्ह्यात ५५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:41+5:302021-05-01T04:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण अशा पुणे जिल्ह्यातील 55 पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण अशा पुणे जिल्ह्यातील 55 पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. यामध्ये पुण्याचे 下下सह载载 पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह महानगर विकास प्राधिकरणचे पोलीस उपायुक्त निलेश अशोक अष्टेकर, परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा काशिनाथ गायकवाड यांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे राज्यातील विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरी आणि उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबददल पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक आणि पोलीस शौर्य पदक दिले जाते. यंदा गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी जिल्ह्यातील 55 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोलीस पदकाचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये स्मार्तना शांताराम पाटील (पोलीस अधीक्षक, बिनतारी विभाग पुणे), लक्ष्मण बोराटे (सहाय्यक पोलीस आयुक्त), प्रतिभा संजीव जोशी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), अरविंद धोंडिंबा आल्हाट (पोलीस निरीक्षक, बिनतारी), विलास शंक र देशपांडे (पोलीस निरीक्षक, ग्रामीण), अशोक विश्वास धुमाळ (पोलीस निरीक्षक, ग्रामीण), शंकर वामन आवताडे (पोलीस निरीक्षक, पिंपरी चिंचवड), अजय हनुमंतराव भोसले (पोलीस निरीक्षक, पिंपरी चिंचवड), प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक, पुणे ग्रामीण), ओनिल रमेश मयेकर (पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग), वैशाली लक्ष्मण चांदगुडे (पोलीस निरीक्षक पुणे), गिरीश सोनावणे (सहायक पोलीस निरीक्षक, ए.सी.बी पुणे), यतीन मनोहर संकपाळ (सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग), अक्षयकुमार कृष्णात गोरड (पोलीस उपनिरीक्षक, पुणे), तुकाराम देवीदास खडके (पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी चिंचवड) तसेच विजय यशवंत गावंडे (सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक रारापोबल गट 2 पुणे), दिगंबर सखाराम लांडे (सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक रारापोबल गट 2), गणेश नामदेव पानसरे (सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक रारापोबल गट 1), अरविंद शिवराम चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक, पुणे), शिवदास अर्जुन गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक,पुणे), प्रल्हाद दत्तात्रय भोसले (सहा.पोलीस उपनिरीक्षक, पुणे), शेखर बाळासाहेब बारवकर (सशस्त्र सहा. पोलीस उपनिरीक्षक, रारापोबल गट 2), सुभाष महादेव शिरकर (सशस्त्र सहा. पोलीस उपनिरीक्षक, रारापोबल गट 2), प्रकाश त्र्यंबक पेंडसे, प्रभाकर, जगन्नाथ टेमकर, मदन श्रीकृष्ण कोरगावकर (सशस्त्र सहा. पोलीस उपनिरीक्षक, रारापोबल गट 2), शिवाजी गुलाबराव शेळके (सहा.पो.उपनिरीक्षक,पुणे), शब्बीर कासीम पठाण (सहा.पो.उपनिरीक्षक, पुणे ग्रामीण), राजेंद्र संताजी जगताप ((सहा.पो.उपनिरीक्षक, पुणे), प्रकाश माणिक शिंदे .(सशस्त्र सहा. पोलीस उपनिरीक्षक, रारापोबल गट1), दिलीप सीताराम काची (सहा.पो उपनिरीक्षक), दत्तात्रय धोंडिबा शेळके (सहा.पो.उपनिरीक्षक,पुणे), विनोद हरी शिंदे (सहा.पो.उपनि, पिंपरी चिंचवड), नारायण शंकर भोसले (सशस्त्र सहा. पोलीस उपनिरीक्षक, रारापोबल गट 7 दौंड), विजय उत्तम भोंग (पोलीस हवालदार/503,पुणे), सतीश ज्ञानेश्वर कुदळे (पोलीस हवालदार, पिंपरी चिंचवड), उमेश माळी (सशस्त्र पोलीस हवालदार,रारापोबल गट 2), अश्विन दत्तात्रय बाठे (सशस्त्र पोलीस हवालदार, रारापोबल गट 2), प्रदीप वाल्मिकीराव शितोळे (पोलीस हवालदार, पुणे), अंकुश मनोहर माने (पोलीस हवालदार, ए.सी.बी)संजय बाळासाहेब पायगुडे (पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक, पुणे), शिवानंद महादेव स्वामी (पोलीस हवालदार, पिंपरी चिंचवड), उमाकांत गोपीनाथ कुंजीर (पोलीस हवालदार, पुणे ग्रामीण), किरण रामभाऊ आरूटे (पोलीस हवालदार, पिंपरी चिंचवड) ,सुनील बबनराव शिंदे (पोलीस हवालदार, पुणे शहर),राजकुमार गणपत बारबोले (पोलीस हवालदार, पुणे), किरण दत्तात्रय देशमुख (पोलीस हवालदार, पुणे), कृष्णा बढे, (पोलीस हवालदार, पुणे), विजय रामदास कदम ((पोलीस हवालदार, पुणे), अमोल जयवंत नेवसे (पोलीस नाईक), सुरेंद्र जगदाळे (पोलीस नाईक), मंगेश निवृत्ती बोराडे (पोलीस नाईक)दिपक शामराव दिवेकर (पोलीस नाईक), राखी योगेश खवले (पोलीस नाईक, गुन्हे अन्वेषण विभाग), हेमलता श्रीकांत घोडके (पोलीस शिपाई), सुलतान मुबारक दांडे, (पोलीस शिपाई, ग्रामीण) यांचा समावेश आहे.
----------------------------------------------------------------------------