पोलीस उपायुक्त महिलेचा भलताच दावा: 'माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:18 PM2021-07-30T17:18:18+5:302021-07-30T17:42:12+5:30

पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी केली होती बिर्याणीची मागणी

Police officer claims woman wrong; "Audio went viral just to replace me." | पोलीस उपायुक्त महिलेचा भलताच दावा: 'माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल'

पोलीस उपायुक्त महिलेचा भलताच दावा: 'माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल'

googlenewsNext
ठळक मुद्देऑडिओ प्रसारित झाल्यानंतर गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेशउपायुक्तांकडून ऑडिओतून छेडछाड केल्याचा दावा

पुणे : संभाषणाची ऑडिओ खोडसाळपणे व्हायरल केला असून,  त्यात काही तांत्रिक बदल किंवा छेडछाड करण्यात आल्याचा दावा पोलीस उपायुक्त नारनवरे यांनी केला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी हप्तेखोरी करत होता. त्याच्यावर कारवाई केल्याने गैरप्रकारांना आळा बसला होता. माझ्यावर रोष होता. माझी बदली व्हावी तसेच माझ्यावर कारवाई होऊन मी अडचणीत यावे, या हेतूने व्हायरल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 
 
पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी कर्मचा-याला एका उपाहारगृहातून पोलीस कर्मचा-याला पैसे न देता बिर्याणी आणण्याचे आदेश दिले.  तेव्हा बिर्याणी घेतल्यानंतर आपल्याच ह्ददीतले हॉटेल आहे ना? मग त्याचालकाला पैसे कशाला द्यायचे, अशी विचारणा केली. या संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाचा ऑडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर पोलीस दलासह समाजात खळबळ उडाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी दिले प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

या फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली असून, प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नारनवरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगितले. .तेव्हा या कर्मचाऱ्याने मॅडम साजूक तुपातील बियार्णी आणू का ?, असे त्यांना विचारले. फार स्पायसी नको....जरा तोंडाला टेस्ट पण आली पाहिजे. त्यामुळे प्रॉंन्स पण आण..  बियार्णीचे पैसे कसे देणार असे नारनवरे यांनी विचारले असता त्याने बिर्याणी घेतल्यानंतर हॉटेलमध्ये पैसे देतो, असे सांगितले.

तेव्हा हद्दीतील त्या चालकाला पैसे कशाला द्याायचे, अशी विचारणा नारनवरे यांनी केली. संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित झाली.  मात्र, नारनवरे यांनी ध्वनीफितीमध्ये तांत्रिक छेडछाड केली असल्याचा दावा केला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणाची पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे आदेश दिले. 

Web Title: Police officer claims woman wrong; "Audio went viral just to replace me."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.