पोलीस पाटील संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:33+5:302021-07-16T04:08:33+5:30

या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते. यावेळी ...

Police Patil team helps CM assistance fund | पोलीस पाटील संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

पोलीस पाटील संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

Next

या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब काळभोर, जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जाधव, राज्य संघटक बळवंत काळे, राज्य संघटक नवनाथ धुमाळ, जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीर, महिला आघाडी अध्यक्ष पुणे तृप्ती मांडेकर, कार्याध्यक्ष रोहिणी हांडे, उपाध्यक्षा मोनिका कचरे आदी पोलीस पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी कोरोनाच्या महामारीमध्ये गाव पातळीवर उत्कृष्ट काम केले आहे. स्वतःसह कुटुंबाची काळजी घेऊन कोविड रुग्णांची मदत केली आहे. आपणही सरकारला काही तरी मदत करावी, या हेतूने आपल्या मानधनातील १३ लाख ३२ हजार रुपये पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल सर्व मान्यवरांनी मनापासून आभार मानले. पोलीस पाटलांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बैठक लावण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

फोटो - पोलीस पाटील संघाच्या वतीने निधी देताना.

Web Title: Police Patil team helps CM assistance fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.