खेड तालुक्यातील पोलीस पाटलांनी जपली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:41+5:302021-05-21T04:10:41+5:30
पोलीस पाटील बळीराम गायकवाड यांना महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. संघटनेने त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आला होता. ...
पोलीस पाटील बळीराम गायकवाड यांना महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. संघटनेने त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. महागडी गोळ्या-औषधे व उपचारासाठी पैसे कमी पडत होते. या परिस्थितीची जाणीव ठेवून पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष यांनी शिंदे यांनी खेड तालुका पोलीस पाटील संघाला अवाहन करून आर्थिक मदतीची मागणी केली. खेड तालुक्यातील पोलीस पाटील यांनी १ लाख ५ हजार रुपये रक्कम जमा करून गायकवाड यांच्या नातेवाइकांकडे सपूर्द करण्यात आली.
पोलीस पाटलांनी एक माणुसकीचे दर्शन घडवून दिल्यामुळे त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे. खेड उपविभागीय अधिकारी अनिल लंभाते यांच्या हस्ते गायकवाड यांच्या कुंटुबीयांकडे रोख रक्कम देण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, राज्य पोलीस संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे, अध्यक्ष अशोक चौधरी, आत्माराम डुंबरे, तृप्ती मांडेकर, अमोल पाचपुते, दादाभाऊ निकाळजे, नीलेश दौडकर, प्रमोद मांजरे, किरण कोहिणकर, संदीप भागडे, नवनाथ कोतवाल, रंजना पिचड व तालुक्यातील पोलीस पाटील या वेळी उपस्थित होते.
२० राजगुरूनगर पोलीस पाटील
खेड तालुका पोलीस पाटील संघाच्यावतीने गायकवाड यांच्या कुटुंबीयांना रोख रक्कम देताना अनिल लंभाते, बाळासाहेब शिंदे पाटील व इतर.