वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांची भरदुपारी ‘गस्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:06 AM2019-04-04T00:06:33+5:302019-04-04T00:08:25+5:30

कायद्याची जरब नाहीच : पोलिसांकडून कारवाई नाही; मात्र लुटूपुटूची समज दिली

Police patrol police for disciplining traffic | वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांची भरदुपारी ‘गस्त’

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांची भरदुपारी ‘गस्त’

googlenewsNext

बारामती : बारामती शहरात दिवसेंदिवस बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. ढिम्म पोलीस प्रशासन आणि उदासीन वाहनचालक यांच्यामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाणही वाढले आहे. भर रस्त्यावर ‘पार्किंग’ करून खरेदीला जाणाऱ्या वाहनचालकांना कोणाचीच भीती उरलेली नाही. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होत ती सुधारण्यासाठी का होईना पोलिसांनी यावर उपाययोजना सुरू केली. सकाळपासूनच पोलिसांनी व्हॅनमधून गस्त घालण्यास सुरुवात केली. मात्र बेशीस्त वाहनधारकांवर कडक कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी त्यांना लुटूपुटूची समज दिली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला.

बारामती शहरामध्ये पोलीस प्रशासनाने अतिक्रमणांवर बडगा उगारण्यासाठी समज देण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ बेशिस्त वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाईचा इशारा पोलिसांनी एक एप्रिलपासून शहरातील प्रमुख मार्गांवर रस्त्यावर वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना पोलीस समज देत आहेत. त्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी भोंगा लावलेल्या पोलीस व्हॅनमध्ये फिरत आहेत.
रस्त्यावर वाहने लावणाºया चालकाला त्याच्या वाहनाचा क्रमांक पुकारून सूचना दिली जाते. त्यावेळी पोलीस व्हॅन रस्त्यावर थांबते. निर्धारित वेळेत वाहनचालक न आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मंगळवारी (दि. २) सकाळी नो-पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी वाहनांना सूचना देऊन देखील तिथे लागणाºया गाड्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे शहरात लागणाºया फूटपाथ व रस्त्यावर फळाची गाडी ,छोटे कपडे व्यावसायिक व इतर छोटे व्यवसाय त्याचप्रमाणे चारचाकी गाड्या पार्क करून लोक खरेदीसाठी जातात. त्यामुळे येथील वाहतुकीचा देखील खोळंबा होत आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक आर. आर. भोसले यांच्यासह पोलिसांच्या पथकाचा समावेश आहे. भिगवण रस्ता, तीन हत्ती चौक, सिनेमा रोड, स्टेशन रोड, गुणवडी चौक, येथे असणारे कापड दुकान, सराफ व्यावसायिक,भाजी मंडई, एस. टी. स्टँड, या दुकानात येणारे कामगार यामुळे ग्राहकांना गाड्या लावायला जागा नसते. त्यामुळे भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण छोटे व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. तसेच नो पार्किंगमध्ये गाड्या लावल्या जातात.

वाहनचालक निर्ढावलेले
पोलिसांनी व्हॅन रस्त्यावर फिरवून सुरुवातीला समज दिली. वाहनांचा क्रमांक पुकारून त्याला वाहन बाजूला घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, भर रस्त्यावर वाहने ‘पार्कींग’ करुन खरेदीला, हॉटेलिंगला जाण्याची सवय एका दिवसात सुटणारच नाही. त्यासाठी कडक कारवाईची गरज आहे. आज पोलिसांनी क्रमांक पुकारून देखील अनेक बेशिस्त वाहनचालकांनी दुर्लक्ष करणेच पसंत केले. काहीजण बिनधास्तपणे कारमध्येच बसून पोलिसांच्या सूचना ऐकत होते. तर छोटे व्यावसायिक पोलिसांनी सूचना दिल्यावर बाजूला गाडे घेण्याची तत्परता दाखवत होते. पोलीस गेल्यावर पुन्हा ‘जैसे थे’ येत होते. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. लुटूपुटूची भाषा या बेशिस्त वाहनचालकांना समजणार नाही.

रस्त्यावरील वाहनांना जॅमर लावण्याची गरज
पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी अनेक दिवसांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली. मात्र, पोलिसांनी व्हॅन रस्त्यावर फिरवून सुरुवातीला समज देण्याचा प्रयत्न केला.भोंग्यातून संबंधित वाहनांचा क्रमांक पुकारून त्याला वाहन बाजूला घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ही लुटूपुटूची कारवाई करण्याऐवजी थेट वाहनांना जॅमर लावणे आवश्यक आहे. शिवाय, रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेली वाहने उचलून पोलीस स्टेशनला नेण्याची कारवाई शहरात सुरूकरावी. पुणे शहराच्या धर्तीवर पोलिसांनी ही कारवाई सुरूकरावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
 

Web Title: Police patrol police for disciplining traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे