५० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 06:51 PM2021-02-22T18:51:00+5:302021-02-22T18:51:35+5:30

वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी ही कारवाई झाली.  

Police personnel caught by Bribery Prevention Department while accepting bribe of Rs 50,000 | ५० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

५० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

पिंपरी : गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीकडून ५० हजारांची लाच घेणारा पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी ही कारवाई झाली.  

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांगतर्गत वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक सचिन जाधव असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीला मदत करण्यासाठी पोलीस नाईक जाधव याने ७५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावून पोलीस नाईक जाधव याला ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Police personnel caught by Bribery Prevention Department while accepting bribe of Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.