शिक्षकावर कोयत्याने हल्ला करणारा विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:57 PM2017-10-07T17:57:25+5:302017-10-07T18:07:26+5:30

सुनील भोर हा विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागला असून वाडेबोल्हाई येथील डोंगरावर दिवसभर थांबल्याने भूक व थंडीमुळे पहाटे घरी परतल्यानंतर अटक केली.

Police in the possession of a student who attacked the teacher | शिक्षकावर कोयत्याने हल्ला करणारा विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

शिक्षकावर कोयत्याने हल्ला करणारा विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्दे वार करून सुनील भोर फरार झाल्यानंतर वाडेबोल्हाई परिसरात एकाच गोंधळ उडाला होता. शिक्षकावर हल्ला केल्यानंतर सुनील भोर याने वाडेबोल्हाई येथील डोंगरावर आसरा घेतला होता.जेवण केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

वाघोली : वाडेबोल्हाई येथील दोन शिक्षकावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेला सुनील भोर (वय १९, रा. वाडेबोल्हाई) हा विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागला असून वाडेबोल्हाई येथील डोंगरावर दिवसभर थांबल्याने भूक व थंडीमुळे पहाटे घरी परतल्यानंतर अटक केली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्या बरोबरच शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी माता विद्यालयामध्ये अकरावीत शिकणार्‍या सुनील भोर या विद्यार्थ्याने केस व गैरवर्तणुकीबद्दल समज देवून अपमान केल्याचा राग मनामध्ये धरून धनंजय आबनावे व दर्शन चौधरी या शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली होती. वार करून सुनील भोर फरार झाल्यानंतर वाडेबोल्हाई परिसरात एकाच गोंधळ उडाला होता. दोन्ही जखमी शिक्षकांना उपचारासाठी वाघोलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी धाव घेवून पोलिसांनी भोर पळाला असल्याच्या दिशेने तपास केला होता. त्याचप्रमाणे आसपासच्या गावामध्ये दिवसभर व रात्री पोलीस त्याचा शोध घेत होते. दुसर्‍या दिवशी पहाटेच्या वेळी सुनील घरी आला होता. सुनील घरी आल्याची बातमी पोलिसांना समजल्यानंतर पोलीस हवालदार बाळासाहेब गाडेकर व मोहन अवघडे यांनी त्याला ताब्यात घेवून अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी चौकशी केली असता शिक्षकांनी अपमान केल्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे भोरने कबूल केले. हल्ला केल्यानंतर डोंगरावरच त्याने एकट्यानेच आसरा घेतला होता.
शिक्षकाला मारहाण करण्याबरोबरच जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याने सुनील भोरवर खुनाचा प्रयत्न व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धनंजय आबनावे यांच्यावर उपचार सुरु असून दर्शन चौधरी यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  
भुकेने व्याकूळ
शिक्षकावर हल्ला केल्यानंतर सुनील भोर याने वाडेबोल्हाई येथील डोंगरावर आसरा घेतला होता. शुक्रवारी दुपारी व रात्री पाउस पडल्याने डोंगरावर त्याला थंडी भरून आली होती. त्याचबरोबर दिवसभर काहीही खाल्ले नसल्याने तो भुकेने व्याकूळ झाला होता. जेवण केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Police in the possession of a student who attacked the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.