तुकाराम मुंढेंना पोलीस संरक्षण, चार वेळा खुनाची धमकी, एकाच व्यक्तीची पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 05:46 AM2017-09-29T05:46:22+5:302017-09-29T05:46:55+5:30
चार वेळा खुनाची धमकी आल्यानंतर पोलिसांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना अखेर संरक्षण दिले. या प्रकाराबाबत बोलताना मुंढे यांनी पोलीस गुन्हेगाराला शोधून काढतील, अशी मोजकीच प्रतिक्रिया दिली.
पुणे : चार वेळा खुनाची धमकी आल्यानंतर पोलिसांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना अखेर संरक्षण दिले. या प्रकाराबाबत बोलताना मुंढे यांनी पोलीस गुन्हेगाराला शोधून काढतील, अशी मोजकीच प्रतिक्रिया दिली.
ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या दरात मोठी वाढ केल्याचे कारण सांगत एका माथेफिरूने मुंढे यांना त्यांच्या कुटुंबासह संपविण्याची धमकी दिली आहे. ही शेवटची धमकी असून, अभ्यंकर-जोशी खून खटल्यापेक्षा हे हत्याकांड भयानक असेल, असा मजकूर पत्रात आहे. यातील तीन पत्रे भुजंगराव मोहिते-पाटील या नावाने पाठविण्यात आली आहेत. यातील अक्षर एकाच व्यक्तीचे आहे. ही सर्व पत्रे पुण्यातूनच आल्याचे दिसत आहे. पीएमपीच्या वतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच, या धमकीच्या पत्रांच्या पार्श्वभूमीवर एक अहवाल राज्य सरकारला पाठविला आहे. दरम्यान, मुंढे यांच्या दालनाबाहेर सुरक्षा पुरविण्यात आली आहे. पोलीसही त्यांच्याकडे येणाºया-जाणाºया व्यक्तींची माहिती टिपत असल्याचे गुरुवारी दिसून आले. इतकेच काय तर त्यांना भेटायला येणारा पीएमपीच्या अधिकाºयांची देखील विचारपूस करण्यात येत होती.