जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; दहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 01:05 PM2021-06-25T13:05:35+5:302021-06-25T13:05:43+5:30

बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे तालुका पोलिसांची कारवाई, ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

Police raid on baramati; Ten people have been charged | जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; दहा जणांवर गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; दहा जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली

सांगवी : बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे तालुका पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. एकूण १० जणांविरुद्ध कारवाई करून मोबाईल सह ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

 याबाबत राहुल दादासाहेब लांडगे पोलिस नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सलीम अब्दुल बागवान (रा.कचेरी रोड बारामती ),तेजस राजवंत आईवळे (रा.इंदापूर रो बारामती ),मंगेश देवराज यशवदे (रा. अमराई बारामती),अमोल भानुदास माळशिकारे (रा.सोमंथळी, सातारा), तुषार शिवाजी विषय (रा. बारामती ),प्रदीप झुंबर अहिवळे (रा. अमराई बारामती),  भारत नाना बनसोडे (रा. इंदापूर), शिवाजी बापूराव माने (रा.जळोची, बारामती), युवराज रोहिदास बेद्रे (रा.एमआयडीसी, बारामती),आनंत कृष्णराव काळे (रा. कैकाड गल्ली, बारामती) यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. 

यामध्ये टेबल, खुर्च्या, मोबाईल, पट्टे असे सर्व मिळून ५३ हजार ६७० रुपए किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Police raid on baramati; Ten people have been charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.