डेक्कन येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोघा मालकांसह १२ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 08:46 PM2020-11-03T20:46:31+5:302020-11-03T20:47:29+5:30
शहरात सध्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुुरु आहे.
पुणे : डेक्कन जिमखान्यावरील मध्यवर्ती ठिकाणी खुले आमपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने छापा घातला. डेक्कन जिमखाना येथील पोरवाल इमारतीत हा अड्डा सुरु होता.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन डेक्कन पोलिसांनी थॉमस लोबो व प्रफुल्ल देवकुळे या दोघा मालकांसह तेथील १० नोकरांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरात सध्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुुरु आहे. ही संधी साधत हा जुगार अड्डा सुरु करण्यात आला होता. याबाबतची माहिती युनिट १च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्री पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर थॉमस लोबो व प्रफुल्ल देवकुळे यांनी स्वत:च्या फायद्याकरीता १० जणांना नोकर ठेवून रोलेट टेबल, आंदर बाहर यावर पैसे लावून जुगार घेत असताना व ते खेळत असताना मिळून आले. पोलिसांनी तेथून जुगाराच्या साधनांसह २० हजार ५० रुपये जप्त केले आहे.