जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, एक हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:57 PM2021-04-08T15:57:58+5:302021-04-08T15:58:50+5:30
सतरा जुगारी अटकेत
पिंपरी: जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १७ जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून एक हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लांडेवाडी, भोसरी आणि थेरगाव येथे बुधवारी या दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
पहिली कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली. हरिश्चंद्र रूपसिंग राठोड (वय ७५), विष्णू संभाजी चव्हाण (वय ५६), महादेव नामदेव वाघमारे (वय ४८, सर्व रा. भोसरी) आणि त्यांचे इतर सहा साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी नितीन खेसे यांनी याबाबत बुधवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे टेल्को रोड, लांडेवाडी, भोसरी येथील मोकळ्या मैदानात पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक हजार ३६० रुपयांचे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली.
दुसरी कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने केली. जुगार चालक मालक दुर्गाराम रुपाराम पटेल (वय ४५, रा. पवार नगर, थेरगाव), रामदास मारुती जांभुळकर (वय ३७, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी), दिलीप बजरंग बारणे (वय ६१, रा. पदमजी पेपर मिल समोर, थेरगाव), बाबासाहेब सीताराम सूर्यवंशी (वय ४८, रा. गुरव चाळ, १६ नंबर, थेरगाव), ज्ञानोबा इश्वर पाटील (वय ४०, रा. पदमजी पेपर मिल समोर, थेरगाव), संजय रोहीदास मोरे (वय ३६, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), संजय मच्छिंद्र मिसाळ (वय ४१, रा. कावेरी नगर, भाजीमंडई जवळ, थेरगाव), मंगेश सुदाम केदारी (वय ३६, रा. १६ नंबर बस स्टॉप, बेलठिका नगर, थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस नाईक भगवंता चिंधू मुठे (वय ३५) यांनी बुधवारी (दि. ७) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारनगर, थेरगाव येथील मयुर पवार यांच्या बिल्डींगमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी छापा घालून आरोपींना रम्मी जुगार खेळताना पकडले. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करत आहेत.