खामगाव येथे पोलिसांचा हातभट्टीवर छापा
By admin | Published: October 14, 2016 05:28 AM2016-10-14T05:28:40+5:302016-10-14T05:28:40+5:30
खामगाव येथे बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा मारून आरोपीसह
यवत : खामगाव येथे बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा मारून आरोपीसह ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यातील आरोपी दुर्योधन संगोडिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक काल (दि.१२) रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की खामगाव येथील भाऊसाहेब विधाते वस्तीसमोर ओढ्याच्या कडेला दुर्योधन संगोडिया हा बेकायदेशीर हातभट्टी गाळत आहे.या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. यु. घोळवे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, सी. डी. झेंडे, शिरसाठ, एम. व्ही. गायकवाड, एन. एस. भोर यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्यांना
हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन, गावठी हातभट्टी तयार करण्याचे साहित्य व तयार दारू असा एकंदरीत ४३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.(वार्ताहर)