कोंढव्यात हुक्का गोदामावर पोलिसांचा छापा; 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 02:59 PM2021-11-17T14:59:04+5:302021-11-17T15:14:23+5:30
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे: कोंढवापोलिस ठाण्याच्या हद्दीतील येवलेवाडीत पोलिसांनी हुक्का साहित्याच्या गोदामावर छापा मारला आहे. परिसरातील साई सर्व्हिससमोर असलेल्या श्रीया हाईट्स या इमारतीच्या पार्किंगच्या जागेमध्ये असलेल्या गोडावूनमध्ये एका इसमाने हुक्क्याचे फ्लेव्हर व हुक्का पिण्याकरीता लागणारे साहित्य विक्रीकरिता साठवून ठेवल्याची खात्रीलायक खबर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून हुक्का तसेच हुक्क्याचे साहित्य ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत तिघांना अटक शहजाद अश्रफ रंगूनवाला (वय ३७), नावेद मुन्नेखान (वय २१), शफीक महंमद मालापुरी (वय १८, सर्व रा. लेक डिस्ट्रिक्ट सोसायटी, येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कारवाईत पोलसांनी जवळपास 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे पुणे हे करीत आहेत. या कामगिरीबाबत कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी अभिनंदन केले आहे.