पोलिसांना वेतनवाढ; शिफारसी सादर, सातव्या वेतन आयोगाच्या शिपाई ते निरीक्षक पदांच्या वेतनश्रेणी ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:47 AM2017-12-14T05:47:31+5:302017-12-14T05:47:39+5:30
सातव्या वेतन आयोगासाठी राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व त्यांच्यातील आर्थिक न्यूनगंड कमी होण्यास व कामातील उत्साह वाढविण्यास मदत होईल, अशी घसघशीत वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला असून, त्यात पोलीस शिपाई ते निरीक्षक पदाच्या वेतनश्रेणी ठरविण्याच्याही शिफारसी सादर करण्यात आल्या आहेत.
- विवेक भुसे
पुणे : सातव्या वेतन आयोगासाठी राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व त्यांच्यातील आर्थिक न्यूनगंड कमी होण्यास व कामातील उत्साह वाढविण्यास मदत होईल, अशी घसघशीत वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला असून, त्यात पोलीस शिपाई ते निरीक्षक पदाच्या वेतनश्रेणी ठरविण्याच्याही शिफारसी सादर करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाºयांना वेतन देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस दलामधील शिपाई ते निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनमध्ये सुधारणा करण्यासाठी बिनतारी विभागातील पोलीस निरीक्षक डी़ एस़ इंगळे व राज्य राखीव पोलीस दलातील निरीक्षक आऱ के. आळेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
पोलिसांची वेतनश्रेणी निश्चित करताना या समितीने महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातील पोलीस दलाचे वेतनाचाही अभ्यास केला़ या तुलनात्मक तक्त्याचा विचार करता सेवाप्रवेशावेळी महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई हा इतर राज्यातील पोलीस शिपाई पदावरील कर्मचाºयांपेक्षा मूळ वेतन व स्थूल वेतन दोन्हीही कमी घेत आहे़
सध्या राज्यातील दर एक लाख लोकसंख्येमागे पोलीस दलाचा विचार केल्यास राज्यातील पोलीस दलावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे लक्षात येते़ महाराष्ट्रात दर एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस कर्मचारी असून, भौगोलिकदृष्ट्या लहान असलेल्या राज्यामधील पोलिसांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्रातील पोलीस दल अत्यंत तोकडे आहे़ तसेच महाराष्ट्रातील पोलीस दलाला ज्या परिस्थिती काम करावे लागते, ते पाहता त्यांच्या वेतनात वाढ करण्याची आवश्यकता असल्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे़
सहायक पोलीस निरीक्षक यांना महसूल विभागातील अपर तहसीलदार या पदाशी समकक्ष पद असल्याने वरिष्ठ ५००० ग्रेड वेतनातील ६ वा टप्पा कमीतकमी वेतन प्रस्तावित केले आहे़ पोलीस हवालदार यांना २८०० ग्रेड वेतनातील ६ वा टप्पा कमीतकमी वेतन प्रस्तावित केले आहे़ याशिवाय वेगवेगळ्या पदावरील कर्मचाºयांच्या मूळ वेतनात वाढ देण्याची शिफारस करण्यात आली आहे़ पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना विशेष शाखेच्या अनुषंगाने प्रोत्साहनपर देय मूळ वेतनांपेक्षा मिळणाºया अतिरिक्त वेतनाची आकारणी केंद्र शासनाने घरभाडे भत्ता आकारणीसाठी जे गुणक वापरले आहे़, त्या गुणकानुसार प्रस्तावित केली आहे़
या शिफारशीमध्ये श्वान शिक्षक, पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, अंगुलीमुद्रा, पोलीस निरीक्षक बिनतारी यांना महसूल विभागतील तहसीलदार या पदाशी समकक्ष असल्याने त्यांना ५४०० ग्रेड वेतनातील ६ वा टप्पा कमीतकमी वेतन म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे़
राज्य मूळ वेतन वाढीव वेतनाची स्थूल वेतन वाढीव वेतनाची
टक्केवारी टक्केवारी
महाराष्ट्र ७२०० ़़़़़़़़ २१०७८ ़़़़
पंजाब १३५०० ४७ ३४८८५ ४०
केरळ १२२०० ४१ ३२२०८ ३५
राजस्थान ९८४० २६ २७२४१ २३
आंध्र प्रदेश १६४०० ५६ २५८७४ १९
तेलंगणा १६४०० ५६ २३८४५ १२