वर्षभरात पोलिसांनी पुन्हा जुळविल्या साडेपाचशे रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 05:59 AM2018-01-11T05:59:39+5:302018-01-11T05:59:50+5:30

दोघांच्या घरांचा जरुरीपेक्षा अधिक हस्तक्षेप, नोकरी, व्यवसायामुळे एकमेकांसाठी मिळणारा कमी वेळ, त्यातून निर्माण होणारे गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे वाद याची परिणीती अगदी घटस्फोटापर्यंत जात होती. पण, पोलिसांनी केलेल्या समुपदेशनामुळे अशा अनेकांच्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्या आहेत.

Police re-matched about five hundred silk over a year | वर्षभरात पोलिसांनी पुन्हा जुळविल्या साडेपाचशे रेशीमगाठी

वर्षभरात पोलिसांनी पुन्हा जुळविल्या साडेपाचशे रेशीमगाठी

Next

पुणे : दोघांच्या घरांचा जरुरीपेक्षा अधिक हस्तक्षेप, नोकरी, व्यवसायामुळे एकमेकांसाठी मिळणारा कमी वेळ, त्यातून निर्माण होणारे गैरसमज आणि त्यातून उद्भवणारे वाद याची परिणीती अगदी घटस्फोटापर्यंत जात होती़ पण, पोलिसांनी केलेल्या समुपदेशनामुळे अशा अनेकांच्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्या आहेत़ पुणे पोलीस दलातील महिला सहाय्य कक्षात येणाºया तक्रारींपैकी ६५५ तक्रारीमध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात पोलिसांना यश आले आहे़
पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या अंतर्गत महिला सहाय्य कक्षाचे काम चालते़ घरामध्ये होणाºया वादाचे रुपांतर अनेकदा भांडणापर्यंत जाते़ त्यातून पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या जातात़ अशा तक्रारीमध्ये अनेकदा प्रासंगिक घटना कारणीभूत असतात़ त्यांना पोलीस ठाणेपातळीवर समुपदेशन करणे शक्य नसल्याने महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ या कक्षामध्ये तज्ज्ञांच्या मदतीने दोघांच्या बाजू समजावून घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येते़
महिला सहाय्य कक्षाकडे आलेल्या अर्जातून समाजात किती वेगाने बदल होत असल्याचे व त्याचे परिणाम विवाह संस्थेवर होत असल्याचे दिसून येते़ त्यात एका बाजूला पूर्वापारपासून चालत असलेला पुरुषसत्ताक पद्धती व पुरुषांच्या बरोबरीने आर्थिक स्वातंत्र्य मिळविलेल्या महिला यांच्यातील संघर्षही दिसतो़ पतीला व त्याच्या घरच्यांना तिचा पैसा हवा असतो, पण तिने कर्तव्यदक्ष सून म्हणूनही सेवा करावी, अशी अपेक्षा दिसून येते़ त्यातून वादावादी व त्याची परिणीती तक्रारीत होताना दिसते़
विवाहबाह्य संबंध हे अनेक प्रकरणात वादाचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे़ त्यात मुलाबरोबरच मुलींचाही समावेश आहे़ त्यात मोबाईल हा प्रमुख अडसर ठरू लागला आहे़ मित्र-मैत्रिणीबरोबर काढलेले फोटो दोघांमधील संशयाला कारणीभूत ठरू लागल्याचे अशा प्रकारच्या तक्रारीमध्ये दिसते़ लग्नानंतर काही महिन्यांतच काही जोडप्यांमध्ये भांडणे होऊ लागली तशी अगदी लग्नानंतर २५ वर्षांनंतरही वादावादी होऊन ते या महिला सहाय्य कक्षात आल्याची उदाहरणे आहेत़

आईला सर्व काही सांगण्याने वाद
दोघांचे एकमेकांवर ५ ते ६ वर्षे प्रेम होते़ त्यांनी आंतरजातीय लग्न केले़ पण, दोघांच्या चालीरीती अतिशय भिन्न होत्या़ नाष्ट्यापादून जेवणापर्यंत़ मुलीला पूजा करायला आवडते, पण मुलाच्या घरात अगदी विरुद्ध परिस्थिती़ लग्नानंतर दोनच महिन्यांत त्यांच्यात वादावादी होऊन ते महिला सहाय्य कक्षात आले़ तेथे दोघांना समजावून घेतल्यावर दोघेही आपल्या आईला सर्व सांगत असत़ त्यातून त्यांच्यात आणखी वाद होत असल्याचे जाणवले़ शेवटी मुलाला आणि मुलीला तुम्हा दोघांचे आयुष्य स्वतंत्र आहे ना, मग प्रत्येक गोष्ट घरच्यांना सांगू नका, असा सल्ला दिला गेला़ तो त्यांनी अमलात आणल्यावर त्यांचा संसार पुन्हा सुरळीत सुरू झाला़

अपेक्षा केवळ गजºयाची
एका महिलेचा अर्ज होता़ त्यांच्या लग्नाला ४५ वर्षे झाली आहेत़ त्यांना मुले आहेत़ पतीने त्यांना वेळ द्यावा, अशी त्यांची मागणी आहे़ अगदी पतीने त्यांना फिरायला घेऊन जावे, गजरा आणावा़ ज्या लग्नानंतर मुलीच्या अपेक्षा असतात़ त्या आता पूर्ण कराव्यात, अशी त्यांची अपेक्षा होती़

महिला सहाय्य कक्षात गेल्या वर्षभरात एकूण २ हजार ३६० अर्ज आले होते़ त्यात ४५० अर्ज पुरुषांचे होते़ त्यापैकी १हजार ७११ अर्जांवर निर्णय घेण्यात आला़ ७१० अर्ज पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यांकडे पाठविण्यात आले़ ६५५ अर्जांमध्ये तडजोड होऊन त्यांच्या संसार पुन्हा सुरळीत सुरु झाला़ महिला सहाय्य कक्षातील समुपदेशन मान्य नसल्याने ३४६ अर्ज न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुढे पाठविण्यात आले़

महिला सहाय्य कक्षात २०१६ मध्ये आलेल्या तक्रार अर्जांपेक्षा २०१७ मध्ये जवळपास ५०० हून अधिक तक्रारींची वाढ झाली आहे़ येथील समुपदेशनानंतर त्यांच्या तडजोड झाल्यावरही कक्षाकडून त्यांच्याशी संपर्क ठेवला जातो़ २-३ महिने त्यांच्याशी बोलून माहिती घेतली जाते़ येथे तडजोड झाल्यानंतरही काही जणांमध्ये पुन्हा वादावादी होते़ अशाही काही केसेस पुन्हा येतात़ त्यांच्यावर कक्षात विचार होतो़ तुमच्यामुळे आमचा तुटणारा संसार वाचला, असे तरुणतरुणी सांगतात, तेव्हा कामाचे एक वेगळे समाधान मिळते़
- कल्पना जाधव, पोलीस निरीक्षक, महिला सहाय्य कक्ष

Web Title: Police re-matched about five hundred silk over a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.