पोलीस भरतीतील गैरप्रकाराची माहिती देणाऱ्यास बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:50 PM2018-03-12T15:50:56+5:302018-03-12T15:50:56+5:30
पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरु झाली आहे़. त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष तर, सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़ दररोज अडीच हजार उमेदवारांची चाचणी होणार आहे़ .
पुणे : राज्यभरातील पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा मुख्यालयात सोमवारपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या पोलीस भरतीत गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अशी माहिती कळविणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा केली आहे़ .
पुणे ग्रामीण पोलीस दलातील १२१ आणि ४९ कारागृह विभागातील पोलीस शिपाईपदासाठी ही भरती करण्यात येत आहे़. त्यासाठी सुमारे ३० हजार अर्ज ग्रामीण पोलीस दलाकडे आले असून त्यांच्या शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीस सोमवारपासून सुरुवात झाली आहे़.
ही पोलीस भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे़. यापूर्वी काही उमेदवारांनी डमी उमेदवारांना परीक्षेला बसविण्याचे प्रकार उघडकीस आले होते़ .अशाप्रकारे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी यंदा सुरुवातीपासूनच काळजी घेण्यात येत आहे़. या पोलीस भरतीमध्ये काही गैरप्रकार आढळल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे़ .गोपनीय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल़ गैरप्रकार आढळल्यास संबंधितांनी पोलीस अधीक्षक (९८२३६२३२१०), पोलीस उपअधीक्षक गृह मुख्यालय (९६८९७७०७७७), हेल्पलाईन (८५५२०१७२८४, ८५५२०२७२८४) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़.
पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदांसाठी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरु झाली आहे़. त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष तर, सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़ दररोज अडीच हजार उमेदवारांची चाचणी होणार आहे़ .
पोलीस भरतीसाठीची प्रक्रिया आम्ही अतिशय पारदर्शक ठेवण्यात आली असून त्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये, याची काळजी घेतली आहे़. तरीही कोणाला असा काही गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास त्यांनी आम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व माहिती योग्य आढळल्यास त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे़ .
सुवेझ हक, पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस