शाळा-महाविद्यालयीन परिसरासाठी पोलीसकाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:57 AM2017-08-06T04:57:43+5:302017-08-06T04:57:46+5:30

शाळा-महाविद्यालयांमध्ये आणि परिसरात चालणाºया टिंगल, भाईगिरी, रॅगिंग, अमली पदार्थांची विक्री अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘पोलीसकाका’ हा उपक्रम सुरू झाला असून

Police-school for the school-college campus | शाळा-महाविद्यालयीन परिसरासाठी पोलीसकाका

शाळा-महाविद्यालयीन परिसरासाठी पोलीसकाका

Next

पुणे : शाळा-महाविद्यालयांमध्ये आणि परिसरात चालणाºया टिंगल, भाईगिरी, रॅगिंग, अमली पदार्थांची विक्री अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘पोलीसकाका’ हा उपक्रम सुरू झाला असून १९५ पोलीस कर्मचाºयांची पोलीसकाका म्हणून निवड करण्यात आली आहे. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांचा फोन आल्यास हे काका मदतीला धावून जाणार आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. शहर व परिसरात ११८० शाळा आणि महाविद्यालये असून अनेकदा गैरप्रकार होतात. स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राईमविषयक गुन्हयांची संख्याही वाढत चालली आहे. अशा वेळी संकटकाळामध्ये कायदेशीर मदत करण्यासाठी तत्काळ धावून येणारा मित्र व मार्गदर्शक म्हणजे पोलीसमित्र. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालय व शाळेसाठी पोलीसकाका म्हणून एक वरिष्ठ कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. त्याचा मोबाईल क्रमांक व फोटो शाळेबाहेर लावण्यात येणार असून शाळांमध्ये त्या त्या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी या उपक्रमांची माहिती देणार आहेत. त्या वेळी पोलीसकाका म्हणून नियुक्त कर्मचाºयाची ओळख करवून दिली जाणार आहे.
या उपक्रमात काम करणाºया कर्मचाºयांवर देखरेख ठेवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नोडल आॅफिसर म्हणून काम पाहिले. शाळा किंवा महाविद्यालयाकडूनही एक शिक्षक किंवा प्राध्यापक नोडल आॅफिसर म्हणून काम पाहिले. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये प्रभावीपणे हा उपक्रम राबविण्याकडे भर देतील.

संकटाच्या वेळी पोलीसकाकांना फोन केला गेल्यास ते त्या ठिकाणी धावून जातील. प्रसंगी बीटमार्शल म्हणून नियुक्त असलेल्या सशस्त्र पोलिसांनाही सोबत घेऊन येतील. वेळोवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विश्वासाचे नाते निर्माण करतील.

Web Title: Police-school for the school-college campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.