उपाययोजना संदर्भात पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:40+5:302021-04-08T04:10:40+5:30

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव ...

Police should take strict action regarding measures: Dilip Walse Patil | उपाययोजना संदर्भात पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी : दिलीप वळसे पाटील

उपाययोजना संदर्भात पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी : दिलीप वळसे पाटील

Next

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, सभापती देवदत्त निकम, विष्णूकाका हिंगे, जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, उपसभापती संतोष भोर, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, शीतल तोडकर, सरपंच किरण राजगुरू, दत्ता थोरात, काँग्रेसचे राजू इनामदार, भाजपचे जयसिंग एरंडे, संजय थोरात, बाळासाहेब बाणखेले, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने आदी उपस्थित होते.

वळसे-पाटील पुढे म्हणाले मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द या गावात प्रशासनाने जातीने लक्ष देऊन येथील कोरोनाचा प्रसार रोखणे गरजेचे आहे. या परिसरातील बाजार,चौकातील गर्दी, आस्थापनातील गर्दी यासाठी पोलिसांनी लक्ष देऊन काम करावे. प्रत्येक गावात नागरिक शासकीय आदेश पाळतात की नाही यासंदर्भात पाहणी करून त्याचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना द्यावा.

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले तालुक्यात सध्या सर्वत्र मोठ्या गावांमध्ये भाजीबाजार, चौकातील गर्दी वाढत चालली आहे. पोलीस प्रशासनाने काळजी घेऊन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई करणे गरजेचे आहे. नागरिकांसाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी लसीकरण केले नसेल त्यांचे लसीकरण सर्व कार्यकर्त्यांनी करून घ्यावे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मनापासून काम केले तर तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.

शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर त्यांना मिळणाऱ्या कमी मानधनावर काम करण्यास इच्छुक नसून त्यांना शरद बँक व भीमाशंकर कारखान्यामार्फत मानधन देण्याची सूचना करून सध्या तालुक्यातील रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर व औषधांची कमतरता होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे निदर्शनास आणून दिले. भाजपचे जयसिंग एरंडे म्हणाले सर्वसामान्य गरीब लोकांकडून जास्त पैसे घेतल्याच्या घटना घडत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी. रवींद्र करंजखेले, सुरेश भोर, वसंतराव भालेराव, ताराचंद कराळे, वैभव बाणखेले व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या.

Web Title: Police should take strict action regarding measures: Dilip Walse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.