चौकीतच पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:07 AM2018-05-09T04:07:40+5:302018-05-09T04:07:40+5:30
मार्केट यार्ड येथील रस्त्यावर रात्री पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याच्या घटनेनंतर सोमवारी थेट पोलीस चौकीत पोलीस नाईकास मारहाण करण्याची घटना घडली.
पुणे : मार्केट यार्ड येथील रस्त्यावर रात्री पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याच्या घटनेनंतर सोमवारी थेट पोलीस चौकीत पोलीस नाईकास मारहाण करण्याची घटना घडली़ रस्त्यावर आरडाओरडा करणाºया चौघांना पोलीस चौकीत आणल्याने त्याचा राग येऊन एकाने पोलीस कर्मचाºयाला केलेल्या मारहाणीत त्यांचा हात फ्रॅक्चर झाला़ याप्रकरणी खडक पोलिसांनी सुरेश डंबर आहुजी (वय ४१, रा़ भवानी पेठ) याला अटक केली आहे़
याप्रकरणी एस. एन. लोहोमकर यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मीठगंज पोलीस चौकीत सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली़
याबाबत पोलिसांनी सांगितले, की गंजपेठ पोलीस चौकीसमोरील एका वाईन्स दुकानाबाहेर चौघे जण आरडाओरडा करीत होते़ त्या वेळी पोलीस चौकीत अमलदार असलेल्या एस़ एऩ लोहोमकर यांनी बाहेर येऊन आरडाओरडा करू नका, असे सांगून चौघांना पोलीस चौकीत आणले़ त्यांच्याकडे चौकशी करीत असतानाच सुरेश आहुजी तेथे आला़ त्याने माझ्या माणसांना का पोलीस चौकीत आणले, असे म्हणून त्यांच्याशी हुज्जत घालू लागला आणि लोहोमकर यांचा हात पिरगळून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला़ खडक पोलिसांनी आहुजी याला अटक केली आहे़ तो एका कन्स्ट्रक्शन साईटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतो़ त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ त्याच्या चार नातेवाइकांवर शांततेचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी खटले भरले आहेत़ सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड अधिक तपास करीत आहेत़
रविवारी रात्री रस्त्याने आरडाओरडा करीत जाणाºया दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडविल्याने त्याने पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की
केली होती़ त्यानंतर लगेच हा दुसरा प्रकार आहे़