कुल्फी विक्रेत्याकडे लाच मागणे पाेलीस उपनिरीक्षकाला पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 06:05 PM2018-11-18T18:05:18+5:302018-11-18T18:11:52+5:30
कुल्फी विक्रेत्याकडे लाचेची मागणी करणाऱ्या पाेलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात अाले अाहे.
पुणे : एका कुल्फी विक्रेत्याकडे लाच मागणे पाेलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले अाहे. लाच मागणाऱ्या पाेलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात अाली अाहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे बिबवेवाडी पाेलीस स्टेशनच्या हद्दीत कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतात. या पाेलीस स्टेशनचे पाेलीस उप निरीक्षक भिकाेबा पांडुरंग देवकाते यांनी तक्रारदारांना तुमचा व्यवसाय अनधिकृत अाहे. त्यासाठी 20 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी तक्रारदारांकडे केली. याविषयी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली हाेती. त्यानुसार सापळा रचण्यात अाला. आज पाेलीस उपनिरीक्षक देवकाते यांना तडजाेडी अंती 10 हजार रुपयाची लाच अप्पर इंदिरानगर पाेलीस चाैकी येथे स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात अाले.
ही कारवाई पाेलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिंबंधक विभाग पुणे यांंनी केली. शासकीय अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास विभागाकडे तक्रार करण्याचे अावाहन लाचलुचपत विभागाकडून नागरिकांना करण्यात अाले अाहे.