कर्तव्य बजविताना पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 16:37 IST2024-09-22T16:37:02+5:302024-09-22T16:37:11+5:30
राजगुरूनगर: खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५ ) यांचे कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

कर्तव्य बजविताना पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू...
राजगुरूनगर: खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५ ) यांचे कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आईवडील,भाऊ असा परिवार आहे.
गेल्या महिन्यापूर्वी ते खेड पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते. सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पोलीस कर्मचारी अर्जुन गोडसे व सहकाऱ्यांनी त्यांना साळुंखे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. पुढील उपचारासाठी चाकण येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.