लोणीकंदचे पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावरून झाले बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 03:15 PM2024-07-27T15:15:31+5:302024-07-27T15:16:09+5:30

बेपत्ता झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून पोलिसांत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Police sub-inspector of Lonikand went missing from duty | लोणीकंदचे पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावरून झाले बेपत्ता

लोणीकंदचे पोलीस उपनिरीक्षक कर्तव्यावरून झाले बेपत्ता

वाघोली - लोणीकंद येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू असलेले राहुल कोळपे यांनी स्वतःच्या मोबाईल स्टेटसवर "माझ्याशी पुढील काही दिवस संपर्क साधू नका" असे स्टेटस ठेऊन  लोणीकंद पोलीस ठाण्याती कालपासून बेपत्ता झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी वाघोली येथील जामा मज्जिदला बंदोबस्त साठी हजर आहे वरिष्ठांना सांगितले. त्यानंतर दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे.

राहुल खंडू कोळपे (वय ३५,वर्षे)असे बेपत्ता झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या बेपत्ता झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून पोलिसांत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या पत्नीने लोणीकंद पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

Web Title: Police sub-inspector of Lonikand went missing from duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.